Solapur : खा.सुळे मंगळवेढा भेटीत शहा कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीशी स्नेहबंध !

शेठजी कुठे आहेत असे म्हणत त्यांना बोलवा म्हणत
solapur
solapursakal

मंगळवेढा : राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी मंगळवेढयातील चोखोबा , दामाजीपंत ,कान्होपात्रा या तीन संताच्या भेटीतही रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहूल शहा यांच्या निवासस्थांनी भेट देत शहा कुटूंबाच्या तिसय्रा पिढीतील राहूल शहा यांच्या भेटीतून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे मंगळवेढ्यातील अनेक दशकांपासून शहा कुटूंबियांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते थेट शहा यांच्या वाड्याला भेट देऊन अधिक दृढ केले .

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्याच्या उमेदीच्या काळापासून येथील स्व. रतनचंद शहा यांचे संबध सलोख्याचे होते. मंगळवेढा - मोहोळ या जुन्या मतदारसंघातील उमेदवारी निश्‍चीत करताना स्व रतनचंद शहा यांच्या शब्द महत्वाचा ठरत असल्याने त्यावर उमेदवारी निश्‍चीत मानली जायची. पुलोद आघाडी , समाजवादी काँग्रेस आणि पुढे राष्ट्रवादीच्या स्थापनेपर्यंत मंगळवेढयातून सगळयात अगोदर स्व.शहा यांनी पवार यांच्या नेतृत्वासोबत राहण्याची भूमिका कायम घेतली . मंगळवेढयाच्या विकासात खा. पवार नेहमी शेठजींचा शब्द प्रमाण मानून हातभार लावून मंगळवेढयाच्या विकासात योगदान दिले.

शहा बॅक ते नगरपलिकेच्या राजकारणाच्या निमित्ताने मंगळवेढ्याचे पहिले थेट नगराध्यक्ष झालेले स्व. रतनचंद शहा यांच्या काळात बांधलेल्या नव्या इमारतीचे लोकार्पण शरद पवाराच्या हस्ते करण्यात आले.एका कार्यक्रम स्थळी स्व. रतनचंद शहा उपस्थित नसल्याचे दिसताच शरद पवार व स्व. आर.आर.पाटील थांबले. शेठजी कुठे आहेत असे म्हणत त्यांना बोलवा म्हणत ते आल्यानंतर कार्यक्रम उरकण्यात आला. यावरून त्यांच्या प्रती असलेले संबंध दिसून आले

त्यानंतर त्यांचे पुत्र स्व .सुभाष शहा यांनाही राजकीय सल्ले देत मंगळवेढयाच्या विकासात योगदान दिले. त्यांच्या अकाली अपघाती निधनांनंतर बॅकेबरोबर शहा गटाच्या राजकीय नेतृत्वाची जबाबदारी तिसऱ्या पिढीतील रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्यावर आली.राजकारणात फारसा अनुभव नसताना शिवाय राज्यात पक्षाची सत्ता नसताना तत्कालीन कॉग्रेसचे आ.स्व भारत भालकेच्या मदतीने नगरपालिकेत राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष करत पवारांशी संबधात राहिले.

राहूल शहा यांनी बॅकेच्या कारभाराबरोबर पर्यावरण संतुलनाचे काम करत राहिले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या सोलापूर शाखेचे ते कार्यकारणी सदस्य असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंगळवेढ्यात वेगवेगळे पाच उपक्रम राबविले त्यामध्ये मुलींचे आरोग्य तपासणी शिबीर,यशवंतराव चव्हाण विषयावरील व अन्य प्रबोधनाचे कार्यक्रम राबविले. खा सुप्रिया सुळे नुकत्याच मंगळवेढा दौय्रावर येवून शहा कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीशी असलेले कौटुंबिक संबध कायमस्वरुपी दृढ असल्याचे दाखवून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com