International Tea Day 2025 : लाखो सोलापूरकरांचा दिवस कटिंगपासून स्पेशल चहापर्यंत; १८-२० प्रकारांची दररोज उलाढाल
Explore Solapur’s Tea Culture: चहा म्हटलं की जीव की प्राण अशी अवस्था काही सोलापूरकरांची आहे. शहरातील सर्वच चौकांची सकाळ चहाने सुरू होते तर दिवसाचा शेवट सुद्धा चहानेच होताना दिसून येतो.
Explore Solapur’s Tea Culture: सोलापुराकरांचे चहा प्रेम इतके आहे की महिन्याकाठी साधारण २०० टन चहाची विक्री होते, असे चहाच्या ठोक व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारातील चहा दुकानांमधून १८ ते २० नैसर्गिक प्रकारच्या चहा पावडर विकल्या जातात.