Solapur : तहसील कार्यालयात दप्तर दिरंगाई वंचित बहुजन आघाडीचे उपोषण

सोलापूर येथील एका खाजगी कंपनीने जालीहळ येथील जमीनीच्या दोन गटातील 25 हेक्टरवर सौर प्रकल्प उभा केला.
उपोषण
उपोषण sakal

मंगळवेढा : तालुक्यातील जालीहाळ येथे ग्रामपंचायतची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या सौर प्रकल्पावर कारवाई करण्यात तहसील कार्यालयाने टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

सोलापूर येथील एका खाजगी कंपनीने जालीहळ येथील जमीनीच्या दोन गटातील 25 हेक्टरवर सौर प्रकल्प उभा केला. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सदर जमिनीचा आकृषक करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घेणे आवश्यक होते. कंपनीने सादर केलेल्या दाखल्यावरील ग्रामसेवकांच्या दाखल्यावरील सही बनावट असून सदर ग्रामसेवकाने आपण ना हरकत दाखला दिला नसल्याचे लेखी पत्र तक्रारदाराला दिले होते.

त्यामुळे या ना- हरकत दाखल्यावरील सही कुणाची ? हा प्रश्न अनुत्तरीत असताना बेकायदेशीर सुरू करण्यात आलेल्या या सौर प्रकल्पावर कारवाई करावी या मागणीसाठी येथील स्थानिक नागरिकांनी तहसील कार्यालयाकडे तक्रार दिली होती या तक्रारीची मंडल अधिकारी आंधळगाव यांनी पाहणी करून सदर जमिनीचा वापर अकृषक कारणासाठी झाल्याचा अहवाल 10 ऑगस्ट 2022 ला तहसीलदारांना सादर केला.बेकायदेशीर रित्या सुरू केलेल्या कंपनीवर कारवाई करावी या मागणीसाठी सातत्याने पत्रव्यवहार केला परंतु तहसील कार्यालयाने यावर कारवाई केली नाही .

व ग्रामसेवकाचा बनावट दाखला सादर केल्या प्रकरणाची चौकशी न करता सदरचं प्रकरण तसच ठेवल्यामुळे व कंपनीने मनमानी करत आपले काम पूर्ण केले आहे.एकुणात महसूल प्रशासनाने केलेल्या दप्तर दिरंगाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 1 मेपासून येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. तहसीलदार मदन जाधव यांनी नव्याने पदभार घेतला आहे त्या एकूणच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या चालढकलीच्या प्रकरणात ते काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com