

Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
esakal
सोलापूर : सूर्याचा आज चित्रा नक्षत्रात प्रवेश झाला. या नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी सोलापूरच्या कमाल तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. जूनपासून आतापर्यंत नक्षत्रे बदलत गेली, मात्र दमदार पाऊस काही आलाच नाही. नक्षत्रे बदलत आहेत, परंतु परिस्थिती बदलत नसल्याने या वर्षी आणि पुढील वर्षीच्या भीषण दुष्काळाचे चटके आतापासूनच बसू लागले आहेत.