Crime News: गुन्ह्याच्या तपासाचा अजब प्रकार! आधी गुन्हे शाखेकडे, मग पोलिस ठाण्यात फिर्याद; एकाची दुचाकी, दुसऱ्याचा मोबाईल चोरीस; घटना घडल्यावर १५ ते ३० दिवसांनी गुन्हा

Solapur Crime News :सोलापुरात मोबाईल आणि दुचाकी चोरीच्या दोन घटनांमध्ये १५ ते ३० दिवसांनी पोलिसांत फिर्याद दाखल झाली. आधी गुन्हे शाखेकडे धाव घेतल्याने तपासाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Solapur police investigate delayed complaints in mobile phone and two-wheeler theft cases.

Solapur police investigate delayed complaints in mobile phone and two-wheeler theft cases.

esakal

Updated on: 

सोलापूर : चोरी, घरफोडी, हाणामारी, छेडछाड, विनयभंग असा कोणताही गुन्हा घडल्यास पहिल्यांदा थेट संबंधित पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली जाते. मात्र, जेलरोड व विजापूर नाका पोलिसांत दाखल दोन गुन्ह्यांतील फिर्यादी आधी गुन्हे शाखेकडे गेले. त्यानंतर एकजण १५ दिवसांनी तर दुसरा ३० दिवसांनी फिर्याद द्यायला पोलिस ठाण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

Loading content, please wait...