सोलापुर : बंद घराच्या दरवाज्याचे कुलुप काढुन ,कपाटातील सोन्याच्या दागिण्याची चोरी

मालिकाप्पा बुगाप्पा नाईकवडे हे नरखेड येथे शेती करतात
chor
chorsakal

मोहोळ : बंद घराच्या दरवाज्याचे कुलुप काढून, आतील लोखंडी कपाटातील सुमारे 71 हजार रुपयाचे सोन्याचे दागिने चोरून नेण्याची घटना नरखेड ता मोहोळ येथे ता 14 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मालिकाप्पा बुगाप्पा नाईकवडे हे नरखेड येथे शेती करतात. शेतात काम जास्त असल्याने नाईकवडे कुटुंब हे शेतातून गावातील घराकडे ये जा करीत असतात. ता 14 ऑगस्ट रोजी नाईकवडे हे गावात येऊन गावातील सर्व काम आटोपून घराला कुलूप लावून शेतातील घरी गेले.

15 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नाईकवडे हे घरी आले असता त्यांना घराच्या दरवाज्याचे कुलूप काढून दरवाजा उघडा असल्याच्या अवस्थेत दिसून आले. घरात गेल्यावर पाहिले असता घरातील लोखंडी कपाटाचेही दार उघडे दिसले, कपाटातील कपडे व अन्य वस्तू इतरत्र पडल्याचे दिसले. कपाटातुन सोन्याच्या अंगठ्या, कानातील झुबे, सोन्याचे वेल व कर्णफुले असा एकुण 70 हजार 500 रुपयांच्या सोन्याचे दागिने घरी कोणी नाही याची संधी साधुन चोरीस गेल्याचे नाईकवडे यांच्या लक्षात आले. या घटनेची फिर्याद मलिकाप्पा नाईकवडे यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास हवालदार गणेश पोफळे करीत आहेत .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com