
सोलापूर : शहरातील हत्तुरे नगरातील स्वामी विद्यालय म्हणजे हत्तुरे जिल्हा परिषद प्रशालेत सुंदर बाग, वड- पिपंळाची झाडे, मुलांसाठी खेळणी व बोलक्या भिंतींनी शाळेचे रूपडे पालटले गेले आहे. हत्तुरे येथील ही शाळा आता शतकाच्या उंबरठ्यावर आहे. १८३२ मध्ये या शाळेची स्थापना झाली. कोरोना काळात शाळा बंद होती. तरी शिक्षकांनी पारावरची शाळा उपक्रम व गृहभेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू ठेवला. नंतर शिक्षकांनी कोरोना संपल्यावर शाळेला नवे रूप देण्याचा प्रयत्न सुरू केला. शाळेच्या परिसरात चहुबाजूंनी झाडे लावली गेली. यामध्ये वड, पिंपळ, शेवगा यासह पपई यांसारखी फळझाडे देखील लावली आहेत.
शाळेच्या संरक्षण भिंतीला लागून शंभरपेक्षा अधिक झाडे लावली आहेत. त्यासोबत परसबाग देखील करण्यात आली. त्यामध्ये वांगी, पालक, शेपू यांसारख्या अनेक भाज्या मुले लावतात. शाळेच्या परिसरात मुलांना खेळण्यासाठी स्मृती ऑरगॅनिक्स कंपनीच्या वतीने सीएसआर फंडातून खेळणी बसवण्यात आली. यामध्ये झुला, घसरगुंडी, सापशिडी अशा अनेक खेळण्यांमुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना खेळण्याचा आनंद मिळतो आहे. मुलांची अभ्यासात गोडी वाढावी म्हणून वर्गखोल्याच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत.
लोकसहभागातून पंधरा लाख रुपये खर्च करून शाळेची इमारत नव्याने रंगवली गेली. प्रत्येक वर्गात मुलांना चित्र, आकृतीच्या माध्यमातून पाढे, गणिते, सामान्य माहिती, विज्ञान आदी विषयांची माहिती वाचता येईल या पद्धतीने रंगवून या भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत. शाळेने माझी वसुंधरा अभियान, ७५ कोटी सूर्यनमस्कार आदी उपक्रमात
सहभाग घेतला.सर्व शिक्षकांच्या मदतीने या शाळेचे रूप बदलण्यासाठी पालकांनी हातभार लावला आहे. त्यामुळे मजरेवाडी भागात एक चांगली शाळा ही ओळख शाळेला मिळाली आहे.
- उषा सुरवसे, मुख्याध्यापिका
ठळक बाबी
शाळेच्या परिसरात लावली १०० झाडे स्मृती ऑरगॅनिक्सच्या वतीने मुलांसाठी खेळणी आठ वर्गखोल्यांची रंगरंगोटी १७५ विद्यार्थ्यांचा पट लोकसहभागातून १५ लाख रुपयांची मदत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.