Solapur : महिनाभरात कामाला मुहूर्त; महिलांच्या कुचंबणेसह आजारांना पायबंद

जुळे सोलापूरसह हद्दवाढीत ‘थ्री स्टार’ स्वच्छतागृहे
Solapur news
Solapur newsesakal
Updated on

सोलापूर : सार्वजनिक स्वच्छतागृहांपासून तीन दशकांहून अधिक काळापासून वंचित राहिलेल्या मुख्य जुळे सोलापूरसह हद्दवाढ भागातील महिलांसाठी सकारात्मक बातमी आहे. शहरात ११ ठिकाणी स्वच्छ भारत मिशन-दोन अंतर्गत आकांक्षा योजनेतून वातानुकूलित ‘थ्री स्टार’ दर्जाची सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. यातून महिलांची गैरसोय दूर होणार आहे. या स्वच्छतागृहांमुळे नैसर्गिक विधीला वेळेत न जाण्यातून महिलांना जडणाऱ्या पोटाच्या आजारांना पायबंद लागेल. शिवाय महिलांची होणारी कुंचबणा थांबणार आहे.

Solapur news
Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

सन २०१५ मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र शासनाने वैयक्तिक आणि झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक शौचालयांकरिता कोट्यवधींचा निधी दिला. मात्र, कामानिमित्त शहरात आलेल्या महिला, बाजारपेठेत खरेदीसाठी परगावहून येणाऱ्या महिला, बागांमध्ये फिरायला येणाऱ्या महिला, युवती यांच्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याकडे शासनाने दुर्लक्ष केले.

Solapur news
Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेतून सोलापूर शहरात २५ सार्वजनिक ठिकाणी ५० ई -टॉयलेट उभारण्यात आली. तथापि, हद्दवाढ वगळून शहराच्या गावठाण भागात उभारण्यात आलेला ‘ई- टॉयलेट’ प्रोजेक्टही अयशस्वी झाला. आता केंद्र शासन आकांक्षी सार्वजनिक शौचालय उपक्रम राबवित आहे. शहरात दर्जेदार सुविधा राबविण्यासाठी आकांक्षी योजना कार्यान्वित होत आहे.

हद्दवाढचा वाढता विस्तार, जुळे सोलापुरात अस्तित्वात आलेली मोठी बाजारपेठ लक्षात घेऊन सोलापूर महापालिका प्रशासनाने स्वच्छ भारत मिशन-दोन अंतर्गत आकांक्षा योजनेतून ११ अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला. याला तीन महिन्यापूर्वी उपसमितीच्या बैठकीत मान्यताही दिली गेली आहे. या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महिनाभरात कार्यारंभ आदेश निघून प्रत्यक्ष कामाला ‘मुहूर्त’ लागणार आहे.

Solapur news
Winter Car Tips : हिवाळ्यात कार गरम ठेवण्यासाठी ब्लोअर वापरताय? एक छोटीशी चूकही ठरू शकते जीवघेणी! अशी घ्या खबरदारी

स्वच्छतागृहे खासगी तत्वावर देण्याचे धोरण

आकांक्षी योजनेतून शौचालये आणि मुताऱ्यांचे होणारे बांधकाम हे दर्जेदार केले जाणार आहे. येथे सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. परिसर अत्यंत स्वच्छ ठेवण्यास मदत होतील अशी रचना असेल. स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे प्रत्येक साहित्य हे उच्च दर्जाचे असणार आहे. आतील परिसर सुंदर व स्वच्छ असेल. दुर्गंधी राहणार नाही. भरपूर पाणी आणि सततची स्वच्छता, फ्रेश होण्याकरिता स्वतंत्र्य व्यवस्था, हात धुवण्यासाठी हॅण्डवाश आदी दर्जेदार सुविधायुक्त ही शौचालय उभारण्यात येणार आहेत. या शौचालयांची दर्जा टिकवून ठेवण्याकरिता तसेच देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च काढण्याकरिता महापालिका अशी शौचालय खासगी तत्वावर चालविण्यास देणार आहे.

Solapur news
Winter Car Tips : हिवाळ्यात कार गरम ठेवण्यासाठी ब्लोअर वापरताय? एक छोटीशी चूकही ठरू शकते जीवघेणी! अशी घ्या खबरदारी

महिलांची आजारातून सुटका

साधारण १२ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहरात बाजारपेठा, उद्याने, शासकीय कार्यालये परिसर, वर्दळीच्या जागा या ठिकाणी महिलांसाठी चांगली स्वच्छतागृहे नाहीत. परिणामी विविध कामांच्या निमित्ताने, तासन्‌तास शहरात थांबाव्या लागत असलेल्या महिलांची गैरसोय होत आहे. नैसर्गिक विधीला वेळेत जाणे शक्य होत नसल्यामुळे अनेक महिलांना पोटाचे आजार जडत असल्याचे वास्तव आहे. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचे हे मत आहे. शिवाय महिलांची कुचंबनादेखील कायम आहे. तथापि, शहरात आता अद्यायवत स्वच्छतागृहे उभारणी जाणार असल्याने महिलांची सोय होईल. जडणाऱ्या आजारांना पायबंद बसेल. शिवाय कुचंबना थांबेल.

Solapur news
Mental Health Tips : दिवसभरातील ताण-तणावानंतर स्वत:ला असे करा रिचार्ज, करा 'या' अ‍ॅक्टिव्हिटी

स्वच्छतागृहांमध्ये मुताऱ्यांचा समावेश

सोलापूर शहर आणि जुळे सोलापूरसह हद्दवाढ भागात नव्या योजनेतून अद्यावत स्वच्छतागृहे उभारताना १०० सीटची शौचालये अन् ४० मुतारी बांधण्याचे नियोजन आहे

नव्या स्वच्छतागृहांची ११ ठिकाणे

जुळे सोलापूर पाणीटाकी पोलिस चौकी बाजूला, जुने वालचंद कॉलेज कंपाउंड लगत, रुपाभवानी अग्निशामकदल केंद्राजवळ, नवीपेठेतील प्राथमिक शिक्षण मंडळ, गुरुनानक चौकातील साधू वासवानी बाग, सातरस्ता नाना-नानी पार्क, विजापूर रोड छत्रपती संभाजी तलाव परिसर, जुना पुना नाका एसटी बसस्थानक क्रोमा शोरूम परिसर, कन्ना चौकातील विणकर बाग, गेंट्याल टॉकीजसमोर पाणी टाकी परिसर.

Solapur news
Hair Care Tips : कोरड्या आणि फ्रिझी केसांना मऊ बनवायचे आहे? मग, ‘या’ टीप्सची घ्या मदत

जुळे सोलापूरकरांच्या मागणीला यश

बाजारपेठा, बागा, वर्दळीचे ठिकाणे आदींसह शहरातील अन्य ठिकाणी स्वच्छतागृहाअभांवी महिलांची होणारी कुचंबणा थांबविण्याकरिता सार्वजनिक शौचालये उभारण्याची मागणी गेल्या दहा वर्षांपासून जुळे सोलापूरकरांची आहे. अखेर स्वच्छ भारत मिशन दोन अंतर्गत या मागणीला मुर्तरुप येणार आहे.

Solapur news
Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

सोलापूर शहरात महापालिकेच्या विविध ठिकाणच्या जागेवर आकांक्षा योजनेतून सुसज्ज, अत्याधुनिक अशा पद्धतीची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. जुळे सोलापूरसह हद्दवाढ भागातील नागरिकांची मागणी होती. तेथील गरज ओळखून स्वच्छतागृहची उभारणी होत आहे.निविदा प्रक्रिया होऊन महिनाभरात काम सुरू होईल.

- मछिंद्र घोलप, उपायुक्त, सोलापूर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com