
सोलापूर : एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी प्रस्तुत व सकाळ माध्यम समूह आयोजित ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ कार्यक्रमात सुरांची मैफल रंगणार आहे. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या संगीत कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूरकरांना भव्य-दिव्य कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीस सोमवार पासून सुरवात झाली आहे.