
सोलापूर : तूर पीक विम्याची तोकडी भरपाई, शेतकऱ्यांचा संताप
मंगळवेढा : 2021 च्या खरीप हंगामात प्रधानमंत्री फसल विमा योजनेत तूर पिकाचा विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 467 रू इतकी तोकडी नुकसान भरपाईची देताना विमा भरलेल्या रकमेच्या दुप्पट रकमेची भरपाई देऊन विमा कंपनीने आपल्या अन्यायाची परंपरा पुन्हा कायम ठेवण्याचा प्रताप केला.तालुक्यातील नदीकाठ व उजनी कालव्याचा क्षेत्र वगळता इतर क्षेत्र हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे या खरीप हंगामात बाजरी,तूर,मका,कांदा,या पीकाचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंटरच्या माध्यमातून भरला होता. गत वर्षापासून या पीकाच्या नुकसानीची कल्पना 72 तासाच्या आत दिली तर भरपाई मिळत असल्याचे संकेत दिल्यामुळे यंदा डिसेंबर 2021 मधील पहिल्या आठवड्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पीक नुकसान होऊन 72 तासाच्या आत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. तर नुकसानीच्या ॲप मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक शेतकरी तक्रार करण्यापासून वंचित राहिले याबाबत विमा कंपनीने त्यांच्या प्रतिनिधीने अल्पशिक्षित मुलांना या सर्वेक्षणासाठी पाठवण्यात आले त्या मुलांनी सर्वे करताना काही ठिकाणी शेतकऱ्याकडून पैसे घेतले तर बहुतांश गावात फॉर्म शेतकऱ्यांच्या समोर न भरता कोय्रा शेतकऱ्याच्या त्यावर सह्या घेऊन नुकसानी टक्केवारी त्यांच्या सोयीने दाखविण्यात आली.
त्यामुळे प्रत्यक्षात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कमी रकमेची भरपाई देऊन शेतकऱ्याच्या नुकसानीच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला.त्यामुळे विमा कंपनीच्या मनमानी कारभाराला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून जाब कधी विचारणार असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. नुकतीच हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून अनेक महसूल मंडळ देखील वगळले आहेत
मी खरीप हंगामातील 50 गुंठे तुरीसाठी 275 रुपयांचा विमा हप्ता भरला होता.दाव्या साठी केलेला खर्च पाहता आम्हाला 467 रुपये इतकी विमा नुकसान भरपाई देऊन माझ्या 80 टक्के नुकसानीची तुलना 467 रुपये केल्याने विमा कंपनीच्या कारभाराबद्दल संताप आला.
निगोंडा पाटील, तूर उत्पादक शेतकरी, मारोळी
Web Title: Solapur Toor Crop Insurance Farmers Angry On Crop Insurance Company Pradhan Mantri Fasal Vima Yojana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..