Ujani Dam Water Release : उजनीतून 1 जानेवारीला शेतीसाठी पाणी! धरणात उरला फक्त 59 टक्के साठा; दीड महिना सुरू राहणार शेतीचे आवर्तन, मराठवाड्याला कधी मिळणार पाणी?

Ujani dam water release date 2027 : कमी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील २१२ गावांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. रब्बी पिकांसाठी उजनी धरणातून १ जानेवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Solapur Rabi crop irrigation water release

Solapur Rabi crop irrigation water release

esakal

Updated on: 

सोलापूर : यंदा जिल्ह्यात खूपच कमी पाऊस झाल्याने सध्या पिण्याच्या पाण्यासाठी २१२ गावांमध्ये टँकर सुरू झाले आहेत. जमिनीची पाणीपातळी खालावल्याने रब्बी पिके तहानली आहेत. या पार्श्वभूमीवर १ जानेवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत उजनीतून शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे. मात्र, शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पाणी सोडण्याची तारीख बदलू शकते, असेही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी (Ujani dam irrigation water schedule January 2027) सांगितले.

Loading content, please wait...