Solapur : वंदे भारतच्या प्रवाशांना हवे कंप्लिट टूर पॅकेज

मध्य रेल्वेच्या अंतर्गत मुंबई-सोलापूर व मुंबई- शिर्डी या रेल्वे सुरू झाल्या.
Vande Bharat Express
Vande Bharat Expressesakal
Updated on

सोलापूर ; मध्य रेल्वेच्या अंतर्गत मुंबई-सोलापूर व मुंबई- शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहे. पण सोलापूरला येणाऱ्या वंदे भारत रेल्वेच्या प्रवाशांना पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर व गाणगापूर या चार ठिकाणी भेट देण्यासाठी आवश्यक ते टूर पॅकेज आयआरसीटीसीने उपलब्ध करण्याची गरज आहे. तशी मागणीही प्रवाशांमधून होत आहे.

मध्य रेल्वेच्या अंतर्गत मुंबई-सोलापूर व मुंबई- शिर्डी या रेल्वे सुरू झाल्या. त्यापैकी शिर्डीला जाणाऱ्या पर्यटकांना केवळ शिर्डी हे एकमेव तीर्थक्षेत्र असल्याने त्यांना वंदे भारतने पोचल्यानंतर थेट शिर्डीतील निवास व भोजनाच्या सेवा मिळतात व ते परतीच्या प्रवासाला निघतात. पण मुंबई-सोलापूर वंदे भारतच्या प्रवाशांच्या गरजा वेगळ्या स्वरूपाच्या आहेत.

एकतर वंदे भारतने सोलापुरात आल्यानंतर आयआरसीटीसीने तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर व पंढरपूरचे टूर पॅकेज प्रवाशांना जोडून देणे आवश्यक आहे. तसेच परतीच्या वंदे भारतच्या वेळेपूर्वी टूर पॅकेजचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. कारण त्या शिवाय वंदे भारतचा धार्मिक पर्यटनाचा हेतू पूर्ण होत नाही.

शिर्डीपेक्षा मुंबई- सोलापूर वंदे भारतसाठी ही वेगळी व्यवस्था करणे आवश्यक आहे. कारण आता वंदे भारत प्रवासी रेल्वेतून उतरल्यानंतर प्रवाशांना रात्री उशिरा कोणतेही टूर पॅकेज मिळत नाही. त्यामुळे हे प्रवासी सकाळी या तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी वाहने शोधत फिरतात. नंतर परतीच्या रेल्वेच्या वेळेपर्यंतचे नियोजन करून देण्यासाठी बाहेर कोणतीही टुरिस्ट सेवापुरवठादार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे हे प्रवासी चारपैकी एक किंवा दोनच धार्मिक स्थळांना भेट देऊन परतत आहेत.

काय करायला हवे

  • - वंदे भारत सोबत तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर व पंढरपूरसाठीचे टूर प्लॅन आयआरसीटीसीने निश्चित करावा

  • - प्रवाशांना अगदी हव्या त्या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठीच्या प्लॅनची निवड करता यावी

  • - रेल्वेच्या चारधाम यात्रेप्रमाणे निवास व दर्शन पॅकेजची सोय असावी

  • - वंदे भारतची यशस्विता टूर कनेक्टिव्हिटी प्लॅनवर अवलंबून

  • - सर्वाधिक महिला प्रवासी असल्याने त्यांना टूर प्लाननुसार पर्यटन करणे सर्वाधिक सुरक्षित ठरेल

मुळातच वंदे भारतने येणारे जवळपास सर्वच प्रवासी हे धार्मिक पर्यटनासाठीच येत आहेत. त्यांना सर्व स्थळांच्या भेटी, भोजन व निवास या सेवा देण्यासाठी रेल्वेने स्थानिक सेवा पुरवठादारासोबत करार करून सेवा द्यावी. त्यामुळे मुंबईहून एखादी महिला एकटी देवदर्शनाला निघाली असेल तर ती टूर पॅकेजमध्ये सहभागी होऊन तिच्या घरी परत येईपर्यंत आपोआप सुरक्षिततेचा अनुभव घेवू शकेल. वेगवेगळ्या दराची सेवा असावी म्हणजे पर्यटकाला त्यांच्या गरजेप्रमाणे निवड करता येईल.

- प्रीती श्रीराम, पर्यटक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Vande Bharat Express
New Pune–Shirdi Express on Track; Faster and Convenient Travel for Pilgrims
Pune Sainagar Shirdi Express welcomed at Daund Cord Line station
Passengers Suffer as Multiple Trains Run Hours Late on Daund-Manmad Route
Marathi News Esakal
www.esakal.com