

Solapur Road Survey
esakal
सोलापूर: येथील जुना विजापूर नाका ते ए.जी. पाटील कॉलेजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून सर्व्हिस रोड केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून मंगळवारपासून दुसऱ्यांदा या रस्त्यावरील अतिक्रमणाचा सर्व्हे होणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी त्यासंदर्भातील आदेश काढले आहेत.