esakal | सोलापूर : वाहून जाताना ग्रामस्थांनी वाचवले तरुणाचे प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

सोलापूर : वाहून जाताना ग्रामस्थांनी वाचवले तरुणाचे प्राण

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर अन् तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु असून मंगळवारीही दिवसभर पाऊस सुरूच आहे सुर्यदर्शन झाले नसून शेतातील उभ्या पिकांचे लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे दोन दिवसांत 71 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली असून धसपिंपळगाव येथील ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी तरुणाचे प्राण वाचवले असून त्याची दुचाकी मात्र वाहून गेली आहे.

अबुझर बासित सौदागर(वय 20 रा.मंगळवार पेठ ,बार्शी)यांस ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी दोरी टाकून वाहत्या पाण्यातून बाहेर काढले यावेळी मंगळवार पेठेतील नातेवाईक,मित्रपरिवाराची उपस्थिती होती ही घटना मंगळवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली.

अबुझर सौदागर याचा जनावरे खरेदीचा व्यवसाय असून जनावरे खरेदीसाठी जात असताना बार्शी-धसपिंपळगाव रस्त्यावर असलेल्या ओढ्याच्या पुलावरुन पाणी वाहत होते तरीदेखील त्याने दुचाकी पाण्यातून नेण्याच्या प्रयत्न करीत असताना पाण्याच्या ओढीमुळे दुचाकीसह वाहून गेला ओढ्याच्या पुढे असलेल्या दगडाला त्याने पकडून ठेवले अन् उभा राहिला सुटकेसाठी तो आरडाओरड करीत असताना ओढ्याजवळ ग्रामस्थ आले.दोरीच्या साहय्याने वाहत्या पाण्यातून त्यास ओढून घेऊन प्राण वाचवले.

शहर अन् तालुक्यातील दहाही मंडलमध्ये मुसळधार पाऊस झाला असून दोन दिवसात बार्शी 72,आगळगाव 68,वैराग 80,पानगाव 88,सुर्डी 64,गौडगाव 57,पांगरी 60,नारी 47,उपळे दुमाला 86,खांडवी 82 असा एकूण सरासरी 71 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

तालुक्यातील ओढे-नाले तुडुंब भरुन वाहत असून अनेक भागातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ओढ्याचे पाणी शिरल्याने उभ्या पिकांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे श्रीपतपिंपरी येथील पुलावरुन पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असून वाहतुकीसाठी हा मार्ग बंद झाला आहे

बंधारे तुडुंब भरुन वाहत असून कोरेगाव,चारे,वालवड, काटेगाव,कळंबवाडी येथील तलाव शंभर टक्के भरले आहेत तर शहरातील सुभाषनगर भागातील गणेश तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होत आहे.

loading image
go to top