esakal | सोलापूर : पत्नीने स्क्रू ड्रायव्हरने मारल्याने पतीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

crime

सोलापूर : पत्नीने स्क्रू ड्रायव्हरने मारल्याने पतीचा मृत्यू

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर : शहरातील रोहिणीनगर भागात दारूच्या नशेत घरी आलेल्या पतीने पत्नीला मारहाण केली. तेव्हा पत्नीने स्क्रू ड्रायव्हरने केलेल्या माराने पतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी बुधवारी (ता. 8) खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट रोजी रोहिणी नगर भाग दोन येथील शिक्षक सोसायटीमध्ये राहणारा श्रीकांत यलगोंडे (वय 29) हा दारू पिऊन रात्री त्याच्या घरासमोर कट्ट्यावर येऊन आवाज देऊ लागला. तेव्हा त्याची पत्नी अश्‍विनी हिने दरवाजा उघडून त्याला घरात नेत असताना श्रीकांतने तिच्या केसाला धरून फ्रीजवरील स्क्रू ड्रायव्हरने तिच्या पिंडरीवर वार करण्यास सुरवात केली. तेव्हा अश्‍विनीने त्याच्या हातातील स्क्रू ड्रायव्हर हिसकावून घेऊन रागाच्या भरात श्रीकांतच्या डोक्‍यावर मारले. तेव्हा तो डोक्‍यातून रक्तस्राव झाल्याने खाली पडला.

हेही वाचा: तुम्ही एमबीए करणार आहात? तर अशी करा 'एमबीए सीईटी'ची तयारी

तेव्हा अश्‍विनीने त्याला बाथरूममध्ये नेऊन त्यास आंघोळ घालून त्याचे रक्ताने भरलेले कपडे बदलून दिले. तसेच जखमेवर हळद लावून त्याला बेडरूममध्ये नेऊन झोपवले. पण तो नंतर न उठल्याने तिने पतीच्या नातेवाइकांना बोलावले. नातेवाइकांनी 31 ऑगस्ट रोजी येऊन पाहिले तेव्हा श्रीकांत मरण पावल्याचे दिसून आल्याचे पोलिसांना कळवले. त्यानंतर विजापूर नाका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सूरज मुलानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी (ता. 8) रोजी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक श्री. मुलानी हे करत आहेत.

loading image
go to top