
सोलापूर : यंदा दिवाळी संपल्यावर हुडहुडी वाढत आहे. यामुळे तापमानाचा पारा खूप खाली घसरत आहे. या थंडीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. तर हुडहुडी भरवणारी थंडी तुरीसह गहू पिकासाठी लाभदायी ठरणार आहे. मात्र, ती आणखी कमी झाल्यास ज्वारीसह नुकतेच लागवड केलेल्या भाजीपाला पिकांच्या वाढीसाठी नुकसानकारक ठरू शकते.