सोलापूर : करिअरसाठी मॅटवरील कुस्तीच महत्त्वाची ठरते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील

सोलापूर : करिअरसाठी मॅटवरील कुस्तीच महत्त्वाची ठरते

वैराग : सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याचे कुस्तीक्षेत्रातील नाते अतूट आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मातीत कुस्ती खेळणाऱ्या मल्लांचे प्रमाण जास्त आहे. मात्र या कुस्त्या जत्रा आणि यात्रा यांच्या पुरत्याच मर्यादित आहेत. जर कुस्तीमध्ये करिअर घडवायचे असेल तर मॅटवरील कुस्ती खेळली पाहिजे, असे मत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांनी वैराग येथे व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंतिम लढत सोलापूर आणि कोल्हापूर यांच्यातच रंगली होती. अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. वैराग येथे त्यांच्या आखाड्यातील मित्र उत्कर्ष डूरे यांची त्‍यांनी भेट घेतली. यावेळी त्‍यांनी कुस्ती शौकिनांशी संवाद साधला. ज्‍युनियर वर्ल्ड स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करून सैन्यदलामध्ये हवालदार पदावर कार्यरत झालेल्या पृथ्वीराज पाटील यांनी कुस्ती दिवसेंदिवस बदलत असल्याचे सांगितले. त्यामुळे मातीचा गंध न सोडता मॅटवरील कुस्तीलाही प्राधान्य द्या, असे तरुणांना सांगितले.

यावेळी महाराष्ट्र केसरी संग्राम पाटील, डॉ. कपिल कोरके, निरंजन भूमकर, उपमहाराष्ट्र केसरी -संग्राम पाटील, बाबासाहेब पाटील, आनंद डुरे, राजवर्धन पाटील, वस्ताद किशोर ताटे, नंदकुमार पांढरमिसे, वैजिनाथ आदमाने, किशोर सावंत, खंडेराया घोडके, सुभाष सुरवसे, नगरसेवक अक्षय ताटे, मेजर जगन्नाथ आदमाने, प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Solapur Wrestling Mat Important Career

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top