

Job Opportunities in Germany
esakal
Solapur Youth Careers: राज्य सरकारने जर्मनीच्या वाडेन-बुटैबर्ग राज्याशी सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार जर्मन भाषेचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या आयटीआय प्रशिक्षित तंत्रज्ञ, परिचारिका, फार्मासिस्ट यांच्यासह विविध क्षेत्रांतील कुशल मनुष्यबळाला जर्मनीत रोजगाराच्या संधी दिल्या जात आहेत. या उपक्रमाचा तालुका व जिल्हा पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे.