सोलापूर : Zpत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

सोलापूर : Zpत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जनजागृती

सोलापूर : भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी जिल्हा परिषद प्रशासन युध्द पातळीवर कामाला लागले आहे. जिल्‍हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय सभा झाली. या सभेच्या माध्यमातून आणखी प्रभावी जनजागृतीचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित असलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तिरंगा भेट देऊन ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जनजागृती झाली.

समन्वय सभेला उपस्थित असलेल्या सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, उप अभियंता या अधिकाऱ्यांना तिरंगा भेट देण्यात आला. यावेळी प्रशासनच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बगाडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज आदी उपस्थित होते.

Web Title: Solapur Zp Public Awareness Har Ghar Tiranga

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..