Solapur : विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षण व त्यांच्या मागण्या मार्गी लावा - प्रशांत परिचारक

अंतरवाली सराटी जि. जालना येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 24 ऑक्टोबर
प्रशांत परिचारक
प्रशांत परिचारकsakal

मंगळवेढा - राज्यात आणखीनच बिकट होत चाललेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सत्ताधारी पक्षाची नाच्चक्की होत असतानाच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून सकल मराठा समाजाच्या आरक्षण व सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा विषय तातडीने मार्गी लावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

अंतरवाली सराटी जि. जालना येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 24 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले मात्र हे उपोषण सुरू करण्यापूर्वी त्यांनी सरकारला मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी चाळीस दिवसाचा अवधी दिला होता.

परंतु या अवधीत कोणताही निर्णय न घेतल्यामुळे अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला या उपोषणाला राज्यातून मराठा बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. विशेषता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात याची मोठी तीव्रता वाढत चालली आहे मंगळवेढा येथे सकल मराठा बांधवांच्या वतीने दामाजी चौकात बेमुदत साखळी उपोषण केले जात आहे

प्रशांत परिचारक
Maratha Reservation Agitation: मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढली! येवल्यात शासनाच्या पोस्टरला फासले काळे

उपोषणात वेगवेगळ्या माध्यमांचा अवलंब करत मराठा आरक्षणास विलंब केल्याप्रकरणावरून सरकारवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत शासनाच्या एसटी वरील फसव्या जाहिरातीचा निषेध देखील पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला कलर फासून व्यक्त केला. महिलांनी शहरांमध्ये मशाल रॅली काढली.

प्रशांत परिचारक
Maratha Reservation : चार युवकांकडून मोबाईल टॉवरवर चढून आरक्षण मागणीसाठी आंदोलन

त्यामुळे सरकार विषयी विरोध मराठा समाजामध्ये वाढत आहे. त्यामुळे या मराठा आणि कुणबी हे एकच असून महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण व कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. यास आपला पाठिंबा असून आंदोलनाकाचे आंदोलन सर्व मागण्या मान्य करण्यासाठी विशेष अधिवेशन तात्काळ बोलावून त्यांच्या समाजाचा विषय मार्गी लावावा.अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com