सोलापूरकरांनो सावधान! चार महिन्यानंतर वाढले कोरोनाचे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid-19 second wave india
सोलापूरकरांनो सावधान! चार महिन्यानंतर वाढले कोरोनाचे रुग्ण

सोलापूरकरांनो सावधान! चार महिन्यानंतर वाढले कोरोनाचे रुग्ण

सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट (covid-19 second wave india) ओसरल्यानंतर 8 ऑगस्टनंतर शहरातील रुग्णसंख्या 15 पेक्षा अधिक कधीच झाली नाही. तर ग्रामीणमध्ये 19 नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच सर्वाधिक रुग्णांची नोंद आज (मंगळवारी) झाली. सोलापूर शहरात 19 तर ग्रामीणमध्ये 24 व्यक्‍ती कोरोनाबाधित आढळल्या. विशेष म्हणजे दीड हजार संशयितांमध्ये 43 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील विविध शहर-जिल्ह्यात रुग्ण वाढत असतानाच सोलापूर शहर-ग्रामीणमध्येही मंगळवारी (ता. 4) सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. कोरोना संशयितांची टेस्ट वाढल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णही वाढल्याचे चित्र समोर आले. सोलापूर शहरातील 583 तर ग्रामीणमधील 928 संशयितांचीच कोरोना चाचणी पार पडली. राज्यभर कोरोनाचे संकट पुन्हा जोर धरू लागल्यानंतरही शहर-ग्रामीणमधील कोरोना संशयितांच्या कोरोना चाचण्या वाढलेल्या नाहीत, हे विशेष. रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस विशेषत: एकही डोस न घेतलेल्यांवरील निर्बंधही शिथिल झाल्याची स्थिती आहे. विविध राजकीय पक्षांचे कार्यक्रम, विवाह सोहळ्यातील गर्दीवरही कोणत्याची प्रशासकीय यंत्रणेचे पूर्णपणे नियंत्रण नाही. अंत्यविधीला केवळ 20 लोकांचीच उपस्थिती बंधनकार असतानाही त्याचे तंतोतंत पालन होत नाही. राज्य सरकारकडून कोरोना वाढू नये म्हणून काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची प्रमुख जबाबदारी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्‍त, पोलिस आयुक्‍त आणि पोलिस अधीक्षकांवर आहे.

ऍक्‍टिव्ह रुग्णांची स्थिती...

ग्रामीणमध्ये अक्‍कलकोट (3), बार्शी (28), करमाळा (7), माढा (8), माळशिरस (9), मंगळवेढा (5), मोहोळ (9), उत्तर सोलापूर (1), पंढरपूर (22) आणि सांगोला (9) असे 98 सक्रिय रुग्ण आहेत. दक्षिण सोलापूर तालुका कोरोनामुक्‍तच आहे. दुसरीकडे शहरातील दोन, चार, पाच, सात, आठ, नऊ, 11, 13, 15, 21, 22, 23, 24 व 26 या प्रभागांमध्ये एकूण 36 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत.

गर्दीवर नियंत्रण अन्‌ लसीकरण वाढविण्याची गरज

सोलापूर शहरातील जवळपास सव्वालाख आणि ग्रामीणमधील साडेचार लाख व्यक्‍तींनी (18 वर्षांवरील) कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा एकही डोस घेतलेला नाही. आता 15 वर्षांवरील मुलांनाही प्रतिबंधित कोवॅक्‍सिन लस टोचली जात आहे. त्यालाही अपेक्षित प्रतिसाद नाही. दुसरीकडे विवाह समारंभातील गर्दी, विविध मुद्‌द्‌यांवर होणारे राजकीय कार्यक्रम आणि अंत्यविधीची गर्दी टाळण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. या बाबींकडे वेळेत लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्‍त केली जात आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top