सोलापूरकरांनो अन्यथा भरा दंड......

 Solapurkars otherwise pay fine ......
Solapurkars otherwise pay fine ......
Updated on

सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. सोलापूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कमी रुग्ण आढळले असल्याने ग्रामीण भागाला लॉकडाऊन मधून अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. सोलापूर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नियमावली तयार करण्यात आली असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आर्थिक दंडाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.


जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतलेल्या आदेशानुसार आता सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर कायम मास्क किंवा रुमाल न वापरणाऱ्या व्यक्तीला शंभर रुपयांचा दंड केला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला दोनशे रुपयांचा दंड केला जाणार आहे. दुकानदार व्यवसायिक यांनी मास्क, हॅन्डग्लोज न वापरल्यास 500 रुपयांचा दंड केला जाणार आहे. फिरते फळविक्रेते, भाजी विक्रेते यांनी मास्क हॅन्डग्लोज न वापरल्यास त्यांना दोनशे रुपयांचा दंड केला जाणार आहे. दुसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याकडून दुप्पट दंड वसूल केला जाणार असून फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

या सर्व नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक, शहरी व नागरी भागासाठी स्वच्छता निरीक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सोलापूर महापालिका, जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषद व ग्रामपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.

जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोक बाहेर पडत आहेत. बाहेर पडल्यानंतर काही ठिकाणी विक्रेते, सर्वसामान्य लोक मास्क वापरत नाहीत, विक्रेते हॅन्डग्लोज वापरत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी थुंकतात ही बाब निदर्शनास आल्यानंतर सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur univercity
Solapur
₹129.48 Crore Pilgrim Facility Project Begins in Pandharpur; Token-Based Darshan Planned
What happened at Pandharpur mosque?
Marathi News Esakal
www.esakal.com