
सोलापूर : उजनी धरण पूर्ण भरले किंवा रिकामे झाले तरी सोलापूरकरांना गेल्या सुमारे २५ वर्षांत कधीच नियमित पाणी मिळालेले नाही. सध्या सोलापूर शहराचा पाणीपुरवठा चार ते पाच दिवसाआड आहे. महापालिकेने सौरऊर्जेचा वापर न केल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दररोज वीजबिलासाठी १३ लाख ८९ हजार रुपये मोजावे लागत आहेत. पाणीपुरवठ्याच्या विजेचे बिल दरवर्षी सरासरी ५१ कोटींपर्यंत आहे.