.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Tembhurni : आसाम येथील लेखवली डिव्हिजन मध्ये 556 ए एस सी बटालियन मध्ये कार्यरत असलेल्या व सध्या सुट्टीवर आलेल्या सैनिक अमोल भीमराव वय 32 वर्ष याचा गुरुवारी (ता.८) रात्री लघुशंकेसाठी बाहेर आला असता एक वाजता जिन्यावरून पडून मृत्यू झाला. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
टेंभुर्णी येथील अमोल आढाव हा युवक 2014 मध्ये आर्मीत दाखल झाला होता नायक या पदावर कार्यरत असलेल्या सैनिक अमोल हा 556 ए एस सी या बटालियनमध्ये लेखवल्ली आसाम येथे कर्तव्य बजावत होता. दरम्यान महिनाभराच्या सुट्टीसाठी तो गावी टेंभुर्णी येथे आलेला होता. गुरुवारी तो परत कर्तव्यावर जाणार होता.