corona update
corona updatesakal media

सोलापूर : शहर कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यात उरले १२९ रुग्ण; चार तालुक्‍यातील स्थिती सुधारली

सोलापूर : शहरात मागील तीन दिवसांत कोरोनाचा केवळ एक रुग्ण आढळला असून आता शहरातील अवघे सात रुग्ण उपचार घेत आहेत. दुसरीकडे दक्षिण सोलापूर तालुका कोरोनामुक्‍त झाला असून अक्‍कलकोट, उत्तर सोलापूर, करमाळा या तालुक्‍यातील कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. आज शहरात एक तर ग्रामीणमध्ये २० नवे रुग्ण आढळले आहेत.
शहरातील कोरोनामुळे होणारे मृत्यू पूर्णपणे थांबले असून ग्रामीणमधील मृत्यूदरही आटोक्‍यात आला आहे. कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण सुरु झाल्यानंतर प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

आज (शुक्रवारी) अक्‍कलकोट, करमाळा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांमध्ये कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. दुसरीकडे बार्शी, माढा, सांगोला तालुक्‍यात प्रत्येकी दोन, माळशिरस तालुक्‍यात सात, मोहोळ तालुक्‍यात एक तर पंढरपूर तालुक्‍यात सहा नवे रुग्ण आढळले आहेत. म्युकरमायकोसिसचा एक रुग्ण वाढला असून या आजाराची रुग्णसंख्या आता ७०५ झाली आहे. सध्या म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या नऊ आहे. ग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचे १२२ तर शहरात सात रुग्ण उपचार घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com