
माळशिरस : समोर अनेक आव्हाने... वडिलांनी भरपूर कष्ट सोसलेले.. आता परिस्थिती बदलायची व वेगळे काहीतरी करून दाखवायचे, अशी मनाशी खूणगाठ बांधली... त्यातून सुरू झाली प्रयत्नांची पराकाष्ठा अन् एका वर्षात एमपीएससीमधून थेट चार जागांवर निवड झाली. ही यशोगाथा माळशिरस तालुक्यातील मोटेवाडी येथील सोमनाथ मधुकर दडस याची आहे.