बार्शी - ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण आणि स्वतःचे उच्च शिक्षण घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असताना दोन वर्षे बार्शीतील शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात शिक्षण घेतले. तेथे सनदी अधिकारी रमेश घोलप यांचे पुस्तक वाचले अन् जिद्दीच्या जोरावर अभ्यास करुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत यशस्वी झाली.महसूल सहायक पदावर तिची निवड झाली आहे. असे उत्साहात सोनाली लोमटे हीने ' सकाळ ' शी बोलताना सांगतले.