
Solapur News: मूलभूत क्षमता प्रत्येकामध्ये अंगभूत असते. पण या क्षमतेला कष्ट व प्रयत्नांच्या आधारे योग्य दिशेने चालना देऊन त्याला यशापर्यंत पोचवण्याचे काम केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन प्रेरकवक्ता सोनू शर्मा यांनी येथे केले. येथील पद्मावती सभागृहात महेश नवमीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.