Mangalwedha Sowing Delayed
esakal
मंगळवेढा - मान्सून पावसाने यंदा ओढ दिल्यामुळे तालुक्यातील 35 हजार हेक्टर वरील खरिपाचे क्षेत्र अडचणीत असून, तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा देखील गंभीर प्रश्न आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने घेतले नसल्याचे सध्यातरी चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे सध्या शासनाऐवजी आकाशाकडे लागले आहेत.