

A computer equipped with an AI system is sent to 25.7 kilometres altitude in a high-altitude balloon experiment near Solapur.
esakal
सोलापूर : पृथ्वीवर डेटा सेंटर उभारण्यासाठी जागा, पाणी आणि विजेची उपलब्धता हा जगभरात चर्चेचा आणि वादाचा विषय बनला आहे. सोलापुरातही उजनीच्या पाण्यात डेटा सेंटर उभारण्याच्या मुद्द्यावरून आंदोलनने सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात डेटा सेंटरसाठी पृथ्वीऐवजी अंतराळाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो का, या दिशेने सोलापूरच्या पार्थ कैरमकोंडा आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्यांनी सोलापूरपासून अवघ्या दहा किलोमीटरवरील केगावच्या माळरानातून बलूनच्या साहाय्याने संगणक तब्बल २५.७ किलोमीटर उंचीवर पाठविला. तेथे उणे ५५ अंश सेल्सिअस तापमानातही संगणक आणि त्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली कार्यरत राहिली. अंतराळातच संगणकीय केंद्रे उभारण्याच्या संकल्पनेच्या दृष्टीने हा प्रयोग महत्त्वाचा ठरणार आहे.