Solapur : सखीचा फोन आला तर बोला बिनधास्त: एआयद्वारे तक्रार संकलन; शिक्षक शिकवतात का?, रेशन मिळते का? सांगा सारे खरे
Solapur News ; एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे एकाच वेळी सुमारे पाच हजार नागरिकांच्या फोनवर कॉल जातो. मी जिल्हाधिकारी कार्यालयातून सखी बोलत आहे. तुम्ही बोलू शकता का?, असे विचारले जाते.
Sakhi AI calls citizens for direct feedback on education, ration, and services—speak freely and truthfully.Sakal
सोलापूर : तुमचा फोन वाजला आणि मी जिल्हाधिकारी कार्यालयातून सखी बोलत आहे, असा फोन आला तर घाबरून कट करू नका. तिने विचारलेल्या प्रश्नाची बिनधास्त उत्तरे द्या. आरोग्य, शिक्षण, पुरवठा विभागाच्या तक्रारी आता तुम्ही बिनधास्त फोनवरच सांगू शकता.