अज्ञात हिंस्र प्राण्याची पसरली दहा गावांमध्ये दहशत ! शेतीच्या कामांसाठीही जाण्यास कोणी धजावेना

Aniket
Aniket
Updated on

वाळूज (सोलापूर) : येथील दहा वर्षांच्या मुलावर हल्ला करणाऱ्या हिंस्र वन्यप्राण्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन सभापती रत्नमाला पोतदार यांनी जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक वनविभाग, सोलापूर तसेच पोलिस अधीक्षक (ग्रामीण) यांना निवेदन दिले आहे. वाळूज (ता. मोहोळ) येथील मुलावर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे वाळूज परिसरातील आठ - दहा गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मंगळवारी (ता. 26) सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान वाळूजच्या उत्तरेला असलेल्या खरात वस्तीवरील अनिकेत अमोल खरात (वय 10) याच्यावर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करून प्राण्यांच्या पायांचे ठसे घेतले आहेत. परंतु हा प्राणी कोणता आहे हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही. या घटनेमुळे वाळूज, देगाव, मनगोळी, भैरववाडी (ता. मोहोळ) तसेच बुद्रूकवाडी, धानोरे, मानेगाव (ता. माढा), भागाईवाडी, साखरेवाडी, शेरेवाडी (ता. उ. सोलापूर), मुंगशी, तडवळे (ता. बार्शी) या परिसरात घबराटीचे व भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी व त्यांचे कुटुंबीय शेतात जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतीची सर्व कामे ठप्प आहेत. 

या भागात ऊसतोडणी चालू होती, मात्र या घटनेमुळे ऊसतोड मजुरांच्या शेळ्या असल्याने ते लोक घाबरून टोळ्या घेऊन निघून गेल्याने ऊसतोड बंद पडली आहे. दुग्धोत्पादन घेणारे शेतकरी सायंकाळी व रात्रीच्या वेळी वस्तीवर वास्तव्यास जात नाहीत. त्यामुळे शेळ्या, मेंढ्या, गाई, गुरे, वासरे वैरणीविना व संरक्षणाविना एकाच जागी बांधून आहेत. पाण्याविना व वैरणीविना त्यांचे हाल होत आहेत. कांदा पीक काढणीच्या अवस्थेत असून कांदा काढणी, कापणी ठप्प झाल्याने काढून टाकलेले कांदे नासत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सध्या ज्वारीचे पीक हुरड्यात तर कुठे भेडे झाले आहे. भीतीमुळे शेतकरी, रोजगारी महिला, पुरुष व सालगडी पिकास पाणी देण्यास जात नाहीत. त्यामुळे या पिकांचे नुकसान होऊन त्यात घट होण्याची शक्‍यता आहे. 

हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे वरील गावांच्या शिवारात भीतीचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांचा शेतातील वावर कमी झाला आहे. त्याचा फार मोठा आर्थिक फटका या भागातील शेतकऱ्यांना व सामान्य माणसांना बसत आहे. अनिकेत खरात या मुलावर हल्ला करणाऱ्या प्राण्याचा शोध घेऊन तातडीने त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय लोकांच्या मनातील भीती कमी होणार नाही व जनजीवन पूर्वपदावर येणार नाही. तरी या प्राण्याचा तातडीने बंदोबस्त करावा व जनतेच्या मनातील भीती दूर करावी. तसेच अनिकेत खरात याच्या कुटुंबीयांना शासन नियमानुसार तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sharad pawar and mla abhijit patil
Solapur Development Work Hit By Election Code Of Conduct With 1483 Crore Water Project And 1024 Crore Flyovers Delayed
Barshi Farmers Raise Water Crisis Before Devendra Fadnavis Seek Permanent Water As Drought Impacts Farming And Families
mohol police pujari trusti meeting
Marathi News Esakal
www.esakal.com