वृध्द, रुग्ण व दिव्यांगाना नेण्यासाठी दुचाकीस्वारांना हवेत विशेष पासः 'यांनी' केली मागणी 

वृध्द, रुग्ण व दिव्यांगाना नेण्यासाठी दुचाकीस्वारांना हवेत विशेष पासः 'यांनी' केली मागणी 
Updated on: 

चिखलठाण(सोलापूर)ः कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दुचाकी वाहनावर एकच व्यक्तीचा नियमात बदल करून रुग्ण, महिला व दिव्यांग यांच्यासाठी स्वतंत्र वाहतूक पासेस उपलब्ध करून त्यांना दुचाकीवर इतरांच्या मदतीने जाण्याची परवानगी आवश्‍यक झाली आहे. 

कोविड 19 या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने आदेश काढले आहेत. दुचाकी वाहनावर एकच व्यक्ती असावा हा नियम करण्यात आला आहे. अनलॉक झाल्यानंतर नागरिक त्यांच्या तातडीच्या गरजा भागवण्यासाठी दुचाकीवर बाहेर पडतात. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना घेऊन दवाखाने व तातडीच्या कामासाठी जातात. 

घरातील सर्वांनाच दुचाकी चालवता येते असे नाही. तसेच तातडीच्या कामासाठी रिक्षा दररोज परवडत नाही. रिक्षा आवश्‍यक वेळेला उपलब्धही नसते. 
शारिरिक विकार गुडघेदुखी, स्थूल शरीर, अपंग, अधू, मणक्‍याचे मानेचे विकार अशा अनेक प्रकारच्या कुटुंबातील व्यक्तींना "दुचाकीवर एकच व्यक्ती "हा नियम जाचक ठरत आहे. 
या जाचक नियमाने अपरिहार्य, आपत्कालीन प्रसंगात अडचणी येत आहेत. . 
या नियमामूळे रुग्णास उपचारासाठी दुचाकीवर घेऊन जाणेही अडचणीचे ठरते. अनेक महिला कर्मचाऱ्यांना वाहन चालवता येत नाही पण त्यांना कामाच्या ठिकाणी जाणे-येणे आवश्‍यक असते. सवलत मिळविणाऱ्या व्यक्ती स्वतःजवळ ओळखपत्र बाळगतील व ते एकाच कुटुंबातील असल्याचा पुरावा सादर करतील किंवा त्यांना पोलीस कार्यालयातून कुटुंब प्रवासाचा पास देणे आवश्‍यक झाले आहे. 

मागणीसाठी पाठपुरावा 
दुचाकीस्वारांना त्यांच्या वृध्द नातेवाईक व रुग्णांना तातडीच्या कामासाठी नेता यावे यासाठी स्वतंत्र पासेसचे वितरण केले तर त्यांच्या अडचणी दुर होऊ शकतात. या साठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. 
- भालचंद्र पाठक, प्रांत सचिव, ग्राहक पंचायत. 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Collector S. Kartikeyan interacts with farmers during a visit to drought-affected areas in Mangalwedha.
Solapur E-Bus Service
DCC Election Draft Voter List Under Scrutiny With 370 Objections From Sangola Madha And Pandharpur Talukas
Madgyal sheep conservation farm in Ranjani seeks infrastructure development and additional facilities
Marathi News Esakal
www.esakal.com