मुंबई व दिल्लीसाठी विशेष रेल्वे सोडाव्यात : सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी 

chember.jpg
chember.jpg
Updated on

सोलापूरः सोलापूर- पुणे, सोलापूूर- मुंबई सह दिल्लीसाठी विशेष रेल्वे गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुरु कराव्यात अशी मागणी सोलापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चरच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे समवेत मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांची भेट घेतली. पदाधिकाऱ्यांनी सोलापूर-कोल्हापूर, सोलापूर-पुणे हुतात्मा, वंदे भारत धर्तीवर सोलापूर-मुंबई-सोलापूर हायस्पीड रेल्वे सुरु करण्याची मागणी करण्यात आली. 
श्री. मित्तल यांना सोलापूर चेंबरच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देऊन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी चर्चा केली.


सोलापूर-मुंबई-सोलापूर, सीएसएमटी (दिल्ली-कटारा धर्तीवर) वंदे भारत हायस्पीड गाडी लवकर सुरु करण्यात यावी. विशेष सोलापूर-कोल्हापूर-सोलापूर विशेष गाडी लवकरांत लवकर सुरु करावी. कारण सोलापूर कोल्हापूर या महामार्गाचे रस्त्यांचे रुंदीकरणामुळे प्रवास करणे अडचणीचे झाले आहे. अनेक व्यापारी, नागरिक, उद्योजक व शासकीय आधिकारी, वकील मंडळी यांनी सदर रेल्वे सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच अनेक भाविकांना महालक्ष्मी देवीचे दर्शनाकरीता, सांगली-मिरज व कोल्हापूर येथे जाण्यांकरीता व सर्वात महत्वाचे कोकण व कर्नाटकला जाणारे मार्ग हे कोल्हापूरांतुन असल्याने ही रेल्वे आवश्‍यक आहे. सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट एक्‍सप्रेस प्राधान्यक्रमाने योग्य एसओपी सह तातडीने सुरु करावी. सोलापूर-पुणे-सोलापूर इंद्रायणी (सुपरफास्ट) इंटरसिटीही पुर्ववत चालु करावी. सोलापूर- नवी दिल्ली-सोलापूर ही नवीन गाडी सुरु करावी. रेल्वेमार्ग दुहेरीकरण, विद्युतीकरणाचे व इतर कामे प्राध्यान्यक्रमाने लवकरांत लवकर पुर्ण करण्यांत यावे. यावेळी सोलापूर स्थानकाच्या स्टेशनच्या सुशोभिकरण, स्वच्छता, प्रवासी लोकांसाठी विविध सोयीसुविधा बद्दल संजीव मित्तल यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी रेल्वेचे डीआरएम शैलेशजी गुप्ता, वरीष्ठ मंडल वाणीज्य प्रबंधक प्रदीप हिराडे, अनिल नायर, आसिफ शेख, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव धवल शहा, संचालक चेतन बाफना, शैलेश बचुवार उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Phaltan Pandharpur railway project land acquisition
Inspiring Cycling Journey Of Dattatray Gaikwad Who Cycles 1500 Km Monthly And Visits Pilgrimage Sites Across Maharashtra
Aherwadi Crime News Young Man Sachin Killed At 24 Over Alleged Illicit Relationship Suspicion Relatives Face Murder Case
Solapur Salary Dispute Turns Tragic As Worker Dies By Suicide After Alleged Assault And Insult Over 600 Rupees
Marathi News Esakal
www.esakal.com