बार्शीत सुरू झालीय आता चष्मा बॅंक !

बार्शीत सुरू झालीय आता चष्मा बॅंक ! सामान्यांना देणार मोफत फ्रेम
बार्शीत सुरू झालीय आता चष्मा बॅंक !
बार्शीत सुरू झालीय आता चष्मा बॅंक !Canva
Updated on

दवाखाना म्हटले की सामान्यांच्या अंगावर काटा येतो. पैसेही जातात अन्‌ मानसिक त्रासही सहन करावा लागतो.

बार्शी (सोलापूर) : दवाखाना म्हटले की सामान्यांच्या अंगावर काटा येतो. पैसेही जातात अन्‌ मानसिक त्रासही सहन करावा लागतो. अनेक सामान्य कुटुंबांना व नागरिकांना रुग्णालयाच्या फीसह इतर औषध- उपचाराचा खर्च परवडत नाही. आपल्या ग्रुपकडून मदत झाली पाहिजे अन्‌ त्याचा खर्चाचा थोडा तरी सोस आपण कमी करू या संकल्पनेतून बार्शीच्या महिला तेजस्विनी क्‍लबने (Women's Tejaswini Club) अनोख्या पद्धतीने चष्मा बॅंक (Spectacle Bank) सुरू केली आहे, अशी माहिती ग्रुपच्या अध्यक्षा शर्वरी फुरडे- केसकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. (Spectacle Bank has started at Barshi for the poor-ssd73)

बार्शीत सुरू झालीय आता चष्मा बॅंक !
अक्षय कुमारच्या प्रेरणेने "तो' बनला कुक ते हॉटेल मालक !

मानवाचा सर्वांत महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळे. थोडा जरी डोळ्यांना त्रास झाला की लगेच प्रत्येकजण डॉक्‍टरांकडून तपासणी करून घेत असतो. काही जणांचा नंबर बदलतो तर काही जणांवर ऑपरेशन करण्याची वेळ येते. शर्वरी फुरडे-केसकर सांगत होत्या, अशावेळी डॉक्‍टर नवीन चष्मा बदलून देतात. त्या वेळी जुना चष्मा अनेकजण घरी नेऊन अडगळीला टाकतात. त्याचा काहीही उपयोग होत नाही. तो चष्मा आमच्या बॅंकेत जमा करा, त्याचा उपयोग आम्ही करू. चष्मा जमा करण्यासाठी तेजस्विनी क्‍लबने भगवंत मंदिर व जैन वाचनालयाजवळ बॉक्‍स ठेवआले असून, शुभारंभानंतर शंभरपेक्षा अधिक चष्मे नागरिकांनी बॅंकेत जमा केले आहेत. या कार्यासाठी तेजस्विनी क्‍लबच्या पल्लवी बजाज, डॉ. प्रांजली कुलकर्णी, डॉ. प्रज्ञा हाजगुडे, डॉ. योगिता कटारिया, वैभवी बुडूख, अनिता सोनिग्रा, अनिता परमार, विद्या काळे यांच्यासह सदस्या प्रयत्नशील आहेत.

बार्शीत सुरू झालीय आता चष्मा बॅंक !
"सीना-भोगावती'साठी उजनीतील पाणी आरक्षणाची गरज !

नागरिक चष्मा बदलला की नवीन चष्मा खरेदी करतात. चष्म्याच्या काचेपेक्षा फ्रेमची किंमत जास्त असते. त्या फ्रेमचा वापर आम्ही गरजूंसाठी करणार आहोत. डॉक्‍टरांच्या तपासणी सेंटर येथे मोफत फ्रेम देण्याची सोय केली जाईल. नागरिकांनी वापरात नसलेले चष्मे बॅंकेच्या बॉक्‍समध्ये ठेवावेत. त्याचा उपयोग निश्‍चितच होणार आहे.

- शर्वरी फुरडे-केसकर, अध्यक्षा, तेजस्विनी ग्रुप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com