Vegalya vata : कल्पकतेच्या जोरावर बनविली दिमाखदार स्पोर्ट्‌स बाईक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vegalya vata

Vegalya vata : कल्पकतेच्या जोरावर बनविली दिमाखदार स्पोर्ट्‌स बाईक

अक्कलकोट : अक्कलकोटसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या आणि घरात कलेचा वारसा असलेल्या श्रीशैल उंबराणीकर यांचा मुलगा नितीन याने टाकाऊ वस्तूंपासून पूर्वी असलेल्या एका मोटारसायकलवर फक्त २० हजार रुपये खर्च करून त्याला आधुनिकतेची जोड दिली आणि कल्पकतेचा वापर करून दिमाखदार स्पोर्ट्स बाईक बनविली. त्याने ही कल्पनाशक्ती जगाला दाखविण्यासाठी स्वतः एक यू-ट्यूब चॅनेल बनवून संपूर्ण मोटारसायकल बनविण्याच्या प्रक्रियेचा व्हिडिओ बनविला आणि तो यू-ट्यूबवर अपलोड केला. त्याला फक्त ८७ दिवसात ७२ लाख व्ह्यूव्ह्ज मिळाले आहे. नितीनच्या या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वास्तविक पाहता नितीन हा काही उच्च विद्याविभूषित नाही. त्याचे शिक्षण जेमतेम बारावी शास्त्र शाखापर्यंत असून त्याची आवड आणि कल ही आयुष्यात वेगळे काही तरी करून दाखवावे, अशी आहे. इतरांसारखे शिक्षण घेतले आणि नोकरी करून पगार घेऊन जीवन जगाला असे करण्याची त्याची इच्छा नव्हती. त्यातून त्याने बारावीनंतर वेगळी सुधारित स्पोर्ट्स बाईक बनविण्याची इच्छा होती.

ती बाईक लोकांच्या पसंतीस उतरवावी आणि भविष्यात, अशा नवनवीन गाड्या बनवून युवकांना या गाड्यांकडे आकर्षित करावे आणि पुढे त्याचे पेटेन्ट मिळवून व्यवसाय करावा, असा त्याचा स्पष्ट हेतू असून तो सध्या त्यासाठी काम करीत आहे. नितीन याने आपले काका देवेंद्र उंबराणीकर यांचे सहकार्य घेऊन एक पल्सर बाईक आणली. त्या बाईकला एक मॉडर्न लूक देऊन तो सुधारणा करत गेला. त्याला सर्व साहित्य आसपास उपलब्ध होते. ही बाईक बनविण्यासाठी त्याला केवळ १२० दिवसात फक्त १५ हजार रुपये खर्च आला. सर्व चाचण्या पूर्ण करून त्याने वेगळी स्पोर्ट्स बाईक बनविली. येवढ्यावरच गप्प न राहता त्याने बाईक बनविण्याची प्रक्रिया यू-ट्यूबवर अपलोड केली. पाहता पाहता ७१ लाख लोकांनी ही बाईकची निर्मिती प्रक्रिया अनुभवली.

ही गाडी पूर्ण तयार झाल्यानंतर अतिशय अवघड रस्त्यावर त्याची सुरक्षित चाचणी पूर्ण केली आहे. त्याला वेळोवेळी बंधू श्रवण आणि चेतन यांनी सहकार्य देखील केले. यापूर्वी नितीनने दहावीत असताना विज्ञानसाठी बनवलेले बहुपयोगी रस्ते निर्मिती प्रक्रिया उपकरणाची राज्यस्तरापर्यंत दखल घेतली गेली होती. त्यातून त्याला प्रेरणा मिळत गेली आणि पुढचे पाऊल टाकत त्‍याने आता स्पोर्ट्स बाईक तयार केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. यातून नितीनला चांगले अर्थार्जन देखील होत आहे. त्याने आपल्‍या संशोधनाची माहिती इतरांना मिळावी या हेतूने नितीन उंबराणीकर या नावाने स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल सुरू केले.

Web Title: Sports Bike You Tube Motorcycle Ingenuity 72 Lakh Viewers New Bike Nitin Umbranikar Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..