Praniti Shinde : शहर विकासाला गती देण्यासाठी विमानसेवा सुरू करा : खासदार प्रणिती शिंदे
Soalpur News : शहरातील प्रलंबित असलेली विमानसेवा तत्काळ सुरू करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
सोलापूर : सोलापूर हे ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, वस्त्रोद्योग आणि धार्मिक पर्यटन यासारख्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. परंतु या ठिकाणाहून थेट विमानसेवा नसल्याने शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत.