
सोलापूर : येथील चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी बिगर अत्यावश्यक दुकाने लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी स्थानिक आमदार व खासदारांना निवेदनाद्वारे केली आहे.
चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, मानद सचिव धवल शहा, प्रवक्ता पशुपती माशाळ, संचालक व कापड व्यापारी संघाचे खजिनदार चेतन बाफना, इलेक्ट्रॉनिक डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर मालु, संजय सेठीया, सुयोग कालाणी, भुषण भुतडा, नितीन जैन, भांडे व्यापारी संघाचे संजय कंदले, नवीपेठ व्यापारी संघाचे प्रकाश आहुजा, माणिक गोयल, खुशाल देडीया, इलेक्ट्रीकल डिलर्स असोसिएशनचे शैलेश बचुवार, अनिल कोठारी, रेडिमेडचे रमेश ढाकलिया, अमित जैन, क्रेडाईचे शशिकांत जीड्डीमनी आदीच्या वतीने आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, खासदार श्री.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे स्वीय सहाय्यक श्री. माळी यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले.
शहरातील बिगर अत्यावश्यक दुकाने ही सकाळी 7 ते सायं 8 वा. पर्यंत सुरू ठेवण्यात यावे. कारण बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक हे अत्यावश्यक वस्तुसमवेत एकसोबतच बिगर अत्यावश्यक वस्तुंची खरेदी करतात. उदा. कपडे, रेडिमेड, भांडी, स्टेशनरी, सोने, इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक (पंखा, कुलर, फ्रीज, शेतीसाठी लागणारे मोटर) वस्तू, ऍटोमोबाईल्स स्पेअर पार्टस, मशिनरी स्पेअर्स पार्टस, सिमेंट, स्टील, फर्निचर, मोबाईल्स शॉप, फू टवेअर आदी वस्तू या ऑनलाइन विकल्या तर बाकीच्या सर्व व्यापारीवर्गांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होऊन अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. आधीच पूर्ण लग्नसराई गेल्यावर्षी वाया गेली. यावर्षी फक्त महाराष्ट्रात बिगर जीवनावश्यक वस्तुंची दुकाने बंद हे एक प्रकारे सर्वांचेच अर्थचक्र थांबविले आहे.
अनेक व्यापारी जे गेल्या वर्षभरापासुन कोरोनामुळे आर्थिक अडचणीचे चक्रव्युहात अडकले आहेत. शासनाच्या आदेशात फक्त बिगर अत्यावश्यक दुकानांना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कडक निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाउनच आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊन ही घोषणा फक्त बोलण्यापुरतीच राहिली आहे. परंतु वस्तुस्थिती काही वेगळेच दिसत आहे, असे मत सर्व व्यापाऱ्यांनी मांडले. आमदार प्रणितीताई शिंदे यांनी याबाबत योग्य ते निर्णय दोन दिवसांत होईल, असे सांगितले. आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मागणी कळवण्याचे सांगितले. एकीकडे उत्पादन सुरु व विक्री बंद याचा परिणाम शासनाला कळवला जाईल. तसेच आमदार सुभाष देशमुख यांना निवेदन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.