सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले शासन निर्णय पुनर्जीवित करून मान्यता घेण्यासाठी आर्थिक भाराची माहिती शिक्षण संचालकांनी मागवलेली आहे. परंतु हे शासन निर्णय पुनर्जीवित केल्यास शासनास आर्थिक भार पडणार नाही. कारण आजही संबंधित कर्मचाऱ्यांना त्याच योजनेच्या अनुषंगाने शासन त्यांचे वेतन आजही देत आहे. त्यामुळे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे डिसेंबर व फेब्रुवारीचे शासन निर्णय पुनर्जीवित करावे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कॉलेज कर्मचारी युनियनतर्फे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन
सोलापूर : सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले शासन निर्णय पुनर्जीवित करा, असे निवेदन कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूरने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिले आहे.
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले शासन निर्णय पुनर्जीवित करून मान्यता घेण्यासाठी आर्थिक भाराची माहिती शिक्षण संचालकांनी मागवलेली आहे. परंतु हे शासन निर्णय पुनर्जीवित केल्यास शासनास आर्थिक भार पडणार नाही. कारण आजही संबंधित कर्मचाऱ्यांना त्याच योजनेच्या अनुषंगाने शासन त्यांचे वेतन आजही देत आहे. त्यामुळे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे डिसेंबर व फेब्रुवारीचे शासन निर्णय पुनर्जीवित करावे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन देताना कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूरचे अध्यक्ष राजेंद्र गोटे, सरचिटणीस अजितकुमार संगवे, कार्याध्यक्ष राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष दत्ता भोसले आदी उपस्थित होते.
संपादन : अरविंद मोटे
Web Title: Statement Minister Samant Behalf College Employees Union
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..