सोलापूर जिल्ह्यातील लस पुन्हा संपली !

जिल्ह्यातील लस पुन्हा संपली ! दोन्ही डोस घेतलेला रुग्ण व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजनविना होतो बरा
Corona vaccine
Corona vaccineEsakal

जिल्ह्यातील पाच लाख 87 हजार 84 जणांनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर त्यापैकी एक लाख 47 हजार 64 जणांनी दुसरा डोसही घेतला आहे.

सोलापूर : शहर-ग्रामीणमधील 114 केंद्रांवर सध्या लसीकरण (Vaccinationa) सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठी आलेली लस पूर्णपणे संपली असून मागील दोन दिवसांत 12 हजार 485 जणांनी पहिला डोस टोचून घेतला आहे. तर 17 हजार 662 जणांना दुसरा डोस टोचण्यात आला आहे. (Stocks of corona vaccine have been depleted again in Solapur district)

Corona vaccine
15 जुलैनंतर शिथिल होणार निर्बंध ! मुंबई लोकलसंदर्भात सावध भूमिका

जिल्ह्यातील पाच लाख 87 हजार 84 जणांनी कोरोनावरील (Covid-19) प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर त्यापैकी एक लाख 47 हजार 64 जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. कोरोना झाल्यानंतर दोन्ही डोस घेणारा रुग्ण व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजनविना बरा होतो, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्यात विशेषत: 45 वर्षांवरील को-मॉर्बिड (पूर्वीचा आजार असलेले रुग्ण) रुग्णांसह 60 वर्षांवरील ज्येष्ठांचा आणि आता 18 ते 44 वयोगटातील तरुणांचाही समावेश आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत 30 हजारांहून अधिक लसीकरण झाले आहे. शहरातील 28 तर ग्रामीणमधील 86 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मात्र, लस शिल्लक राहात नसल्याने या केंद्रांवरील लसीकरणात सातत्य राहात नसल्याचे चित्र आहे.

Corona vaccine
अमेरिकेतील शीतल सोनार उलगडणार अक्षरकलेतून पंढरीची वारी !

लसीकरणात बार्शी अव्वल तर मोहोळ, सांगोला पिछाडीवर

जिल्ह्यात आतापर्यंत पहिला आणि दुसरा डोस मिळून सात लाख 34 हजार 148 जणांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांपैकी बार्शी तालुक्‍यात (26.50 टक्‍के) सर्वाधिक लसीकरण झाले आहे. तर मोहोळ व सांगोला तालुक्‍यात अन्य तालुक्‍यांच्या तुलनेत सर्वांत कमी लसीकरण झाले आहे. लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नसल्याचा अनुभव येऊ लागला आहे. मोहोळ तालुक्‍यातील एक लाख 98 हजार 119 जणांचे तर सांगोल्यात दोन लाख 30 हजार 977 जणांचे लसीकरण करण्याचे टार्गेट आहे. त्यापैकी मोहोळ तालुक्‍यातील 17.36 टक्‍के तर सांगोल्यात 15.73 टक्‍केच लसीकरण झाले आहे. लसीकरणाबद्दल अजूनही संभ्रम कायम असल्याचे चित्र या तालुक्‍यांमध्ये दिसत आहे.

तीन हजार डोस मिळणार

जिल्ह्यासाठी तीन हजार डोस मिळाले आहेत. ही संपूर्ण लस माढा तालुक्‍यात दुसऱ्या डोससाठी वापरली जाणार आहे. माढा तालुक्‍यातूनच लस आणायला वाहन पाठविण्यात आले होते. दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्यांची संख्या या तालुक्‍यात सर्वाधिक होती. दुसरीकडे, शहर-ग्रामीणमध्ये अवघे दीड हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे आज (शनिवारी) दुपारनंतर संपूर्ण केंद्रे लसीअभावी बंद ठेवावी लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com