Solapur: चिमुकल्या आरोहीचा जीव घेणारा दगड मिळाला; टिकेकरवाडी येथील दुर्घटनेची घेतली गंभीर दखल, अद्याप आरोपी माेकाटच

यात्रेसाठी मामा व आजोबाच्या समवेत रेल्वेने प्रवास करणाऱ्या आरोही अजित कांगरे या चार वर्षीय चिमुकलीचा अज्ञात व्यक्तीने भिरकावलेल्या दगडामुळे जीव गेला होता. खिडकीजवळ पाठमोरी बसून बिस्कीट खाणाऱ्या या चिमुकल्या कानाच्या मागे हा दगड लागला होता.
"The stone that ended Aarohi’s life: Tikekarwadi tragedy sparks outrage as accused still absconding"
"The stone that ended Aarohi’s life: Tikekarwadi tragedy sparks outrage as accused still absconding"sakal
Updated on

सोलापूर : कर्नाटकातील यात्रेवरून परत येताना व्होनसळ (ता. उत्तर सोलापूर) येथील आरोही कांगरे या चार वर्षाचा चिमुकलीचा जीव घेणार दगड विजापूर - सोलापूर - रायचूर या रेल्वेच्या डब्यात मिळाला असून या घटनेची रेल्वे विभागाने गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलिसांची पुणे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com