विविध ठिकाणी 15 एसटी बसवर दगडफेक! आंदोलन पेटण्याची शक्‍यता

विविध ठिकाणी 15 एसटी बसवर दगडफेक! आंदोलन पेटण्याची शक्‍यता; दोन चालक जखमी
एसटी बस
एसटी बसsakal
Updated on
Summary

विविध ठिकाणी 15 एसटीवर अज्ञात इसमांकडून दगडफेक करण्यात आली. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला गालबोट लागल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील टाकळी येथे गाणगापूर ते मुंबई (Mumbai) एसटीवर शुक्रवारी (ता. 5) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास व जुना तुळजापूर नाका, बाळे, पुणे नाका, मुळेगाव रोड, वडकबाळ अशा विविध ठिकाणी 15 एसटीवर (ST Bus) अज्ञात इसमांकडून दगडफेक करण्यात आली. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला गालबोट लागल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

एसटी बस
वडशिंगे गावात दरोडा! दोन लाखांचा मुद्देमाल लुटला; तिघांना केले जखमी

शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गाणगापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक KA 32 F2446 या एसटीवर टाकळी येथे अज्ञात इसमाकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये चालक पंडित आडोळे (वय 50) यांच्या छातीस दगड लागल्याने जखमी झाले. टाकळी येथे झालेल्या दगडफेकीचा गुन्हा मंद्रूप पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. तर मुळेगाव येथे झालेल्या दगडफेकीत चालक आलुरे (वय 48) यांच्या डोळ्यास मार लागल्याने जखमी झाले आहेत. दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले असल्याचे या वेळी सांगण्यात आले. विविध ठिकाणी करण्यात येत असलेल्या दगडफेकीमध्ये एसटीचे नुकसान होत आहे व राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास गालबोट लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

विविध मागण्यांसाठी 27 ऑक्‍टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या काम बंद आंदोलनामुळे काही अंशी गाड्या सुरू आहेत. 80 टक्के वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या बऱ्याच आगारांतून बस बाहेरच पडल्या नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सणासुदीच्या दिवसांत एसटीला मोठी गर्दी असते. परंतु, त्याच दिवसांत हे आंदोलन सुरू झाल्याने प्रवासी फलाटावरच अडकून पडले. यामुळे जिल्ह्यातील 80 ते 85 टक्के वाहतूक बंद आहे.

राज्यात सुमारे 30 एसटी कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेपोटी आत्महत्या केल्या आहेत. तरीदेखील राज्य मार्ग परिवहन कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने नाइलाजाने सर्व संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून 27 ऑक्‍टोबरपासून राज्यभर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलिनीकरण करावे ही प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांची असल्याने या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अग्रीम उचल शासनाच्या नियमाप्रमाणे 12 हजार 500 दिवाळीपूर्वी देण्यात यावी, दिवाळीचा बोनस 15 हजार देण्यात यावा, मासिक वेतन नियोजित तारखेस करावे, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

एसटी बस
दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या चिमुकलीवर काळाचा घाला!

मागील दोन ते तीन दिवसांपासून अज्ञात इसमांकडून एसटीवर विविध ठिकाणी दगडफेक करण्यात येत आहे. एसटी कर्मचारी हे आपल्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने उपोषण करीत आहेत. मात्र अज्ञातांकडून दगडफेक करण्यात येत असल्याने या उपोषणास गालबोट लागत आहे. त्यामुळे अशा इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनास प्रशासनाकडून विनाकारण संशयी नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन वाढत आहे.

- श्रीकांत शड्डू, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी वर्कर कॉंग्रेस इंटक, सोलापूर

मागील दोन ते तीन दिवसांपासून एसटीवर दगडफेक करण्याचे प्रकार घडले आहेत. यामध्ये आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात 15 गाड्यांचे नुकसान झाले तर दोन चालक जखमी झाले आहेत. पोलिस प्रशासनाकडून याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.

- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com