तीन तालुक्‍यांत सोमवारपासून कडक लॉकडाउन?

तीन तालुक्‍यांत सोमवारपासून कडक लॉकडाउन?
Lockdown
LockdownEsakal
Summary

ग्रामीणमध्ये कमी झालेला कोरोना आता पुन्हा डोके वर काढू लागला आहे.

सोलापूर : ग्रामीणमध्ये कमी झालेला कोरोना (Covid-19) आता पुन्हा डोके वर काढू लागला आहे. दररोज सरासरी साडेपाचशे ते सहाशे रुग्ण वाढत असून त्यामध्ये सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माळशिरस (Malshiras), पंढरपूर (Pandharpur) व माढ्यात (Madha) मोठी रुग्णवाढ आहे. तर करमाळा (Karmala), सांगोला (Sangola) या तालुक्‍यांमध्येही कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारी ग्रामीणमध्ये 578 रुग्ण वाढले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढत असताना प्रशासन वेळकाढूपणा करणार नाही, त्यामुळे पहिल्या टप्प्यात तीन तालुक्‍यांमध्ये सोमवारपासून कडक लॉकडाउन (Lockdown) होण्याची शक्‍यता आहे.

Lockdown
खाजगी सावकारकीतून मित्राचे अपहरण! 24 तासात सूत्रधार अटकेत

सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक तीन, सात, दहा, 15 ते 17 आणि 23 ते 25 मध्ये 12 रुग्ण आढळले आहेत. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीणमध्ये शुक्रवारी सर्वाधिक 154 रुग्ण माढा तालुक्‍यात तर पंढरपूर तालुक्‍यात 126 आणि माळशिरस तालुक्‍यात 122 रुग्ण वाढले आहेत. अक्‍कलकोट व दक्षिण सोलापुरात प्रत्येकी दोन, उत्तर सोलापूर तालुक्‍यात तीन, बार्शीत 31, करमाळ्यात 57, मोहोळ तालुक्‍यात 38, सांगोल्यात 46 रुग्ण आढळले आहेत. ग्रामीणमधील ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या चार हजार 476 झाली असून शहरातील 69 रुग्णांवरही उपचार सुरू आहेत. म्युकरमायकोसिसचा शुक्रवारी एक रुग्ण वाढला असून या आजाराच्या रुग्णांची संख्या आता 626 झाली आहे. सद्य:स्थितीत 24 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऍक्‍टिव्ह रुग्णांची (उपचार घेणारे रुग्ण) संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, संपूर्ण तालुक्‍यात की रुग्ण वाढत असलेल्या गावांमध्येच कडक निर्बंध असतील, याची उत्सुकता आहे.

Lockdown
राज्यमंत्र्यांच्या मेसेजला मुख्य सचिवांकडून उत्तर नाहीच

होम क्‍वारंटाइनच्या निकषांचे पालन नाहीच

आतापर्यंत ग्रामीण भागातील तब्बल 25 लाख 22 हजार 432 संशयितांना होम क्‍वारंटाइन करण्यात आले. सध्या त्यापैकी 14 हजार 787 संशयित होम क्‍वारंटाइन आहेत. तर अडीच लाखांहून अधिक जणांना इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यक्‍तींना क्‍वारंटाइन करूनही रुग्णसंख्या कमी करण्यात प्रशासनाला यश मिळालेले नाही. खेड्यापाड्यातील लोक मास्क वापरत नाहीत, नियमांचे पालन करत नाहीत, असा ठपका ठेवून तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाने कडक लॉकडाउनच्या दिशेने पाऊल उचचले आहे. पुढील आठवड्यात त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com