Solapur News : विद्यार्थ्यांचा जीव मुठीत ; गतिरोधक नसल्याने अपघाताचा धोका

या राष्ट्रीय महामार्गावर माचणूर व ब्रह्मपुरी दरम्यान असणाऱ्या सिद्धेश्वर प्रशालेच्या मुख्य प्रवेशद्वारसमोर गतिरोधक नसल्यामुळे शाळेत येताना जाताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.
Solapur News
Solapur Newssakal

सोलापूर ब्रह्मपुरी -मंगळवेढा : या राष्ट्रीय महामार्गावर माचणूर व ब्रह्मपुरी दरम्यान असणाऱ्या सिद्धेश्वर प्रशालेच्या मुख्य प्रवेशद्वारसमोर गतिरोधक नसल्यामुळे शाळेत येताना जाताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. रस्त्यालगत असणाऱ्या शाळेमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतच्या या शाळेमध्ये साधारण 1012 विद्यार्थी शिकतात.

अतिवेग, रस्त्यावरती पार्किंग, वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघनामुळे या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. वेगावर आवर घालण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक बसवले जातात मात्र चक्क शाळेसमोरच गतीरोधक नसल्यामुळे शाळेत जाताना भरधाव वेगाने वाहणाऱ्या वाहनांचा धोका असल्याने विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी जीव मुठीत धरून कसरत करावी लागत आहे. शाळेतील संस्थेला विद्यार्थ्यासाठी धोकादायक रस्ता माहीत असूनही याचा पाठपुरावा न केल्यामुळे तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनीही याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केले आहे .परंतु शाळेत जाणाऱ्या पाल्याची चिंता मात्र पालक वर्गाना लागली आहे.

माचणूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे सततची वाहनाची वर्दळ असून रस्त्या लगतच शाळेची इमारत आहे तसेच बेगमपूर प्रमुख बाजारपेठ असल्यामुळे या भागातील छोट्या-मोठ्या वाहनाची वर्दळ सतत चालू असते. सोलापूर -कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गाचे संपूर्ण काम झाल्याचे बोळवण करत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी या मार्गावर असणाऱ्या अडचणी कडे दुर्लक्ष केले आहे. बेगमपुर , माचणूर व ब्रह्मपुरी दरम्यान असणाऱ्या महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण असून दोन्ही बाजूंनी डीवाईडर नसणे ,रस्ता खोदणे, सर्विस रोड रस्त्यावर जड वाहनांची पार्किंग करणे, दोन्ही बाजुनी सर्विस रोड न देणे,सर्विस रोडची दुरुस्ती न करणे आदी समस्यांना सामोरे जात असतानाही सोयीस्कररीत्या दुर्लक्षित होत आहे.

Solapur News
Solapur News : मंगळवेढा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या "आदर्श शिक्षक "पुरस्काराचे वितरण

महामार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशी वर्गास अडचणीचा ठरत असून छोटे-मोठे अपघात होत आहे हे माहीत असूनही काम झाल्याचे गवगवा करीत आहे. अजूनही महामार्गावरील काम अंतिम टप्प्यात झाले असले तरीही राष्ट्रीय महामार्ग अधिकारी काम झालेले आहे असे सांगून झटकत आहे. राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या प्रत्येक गावातील सर्विस रोड असणाऱ्या शाळा समोर गतिरोधक नसणे, बाह्य वळणे, दिशादर्शक फलक आदी कामे अपूर्ण असून इचंगाव (ता.मोहोळ) येथील असणारा टोळ मात्र प्रवासी वर्गाकडून जबरीने वसूल केला जात आहे.

परंतु महामार्गावर असणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या संकटास या भागातील जनतेस व प्रवाशी वर्गास सामोरे जावे लागत आहे.तरी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्याने त्वरीत शाळेसमोर गतिरोधक करावे अशी मागणी या भागातील जनतेतून व विद्यार्थी पालक वर्गातून होत आहे. माचणूरच्या मंदिराकडे व बेगमपूरला जाण्यासाठी हा प्रमुख रस्ता असून सततची वाहनाची वर्दळ असते. शाळेसमोर गतिरोधक नसल्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता आम्हा पालकास लागली असून राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी गतिरोधक लवकर बसवून घ्यावे.'

- काकासाहेब पाटील, ब्रह्मपुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com