
सोलापूर : सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांसोबत युती करण्याच्या भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या निर्णयावर आमदार सुभाष देशमुख चांगलेच संतापले आहेत. सोबत येण्याचे आवाहन माध्यमांद्वारे करू नका. मी तुमचा पालक आहे, अशा शब्दांत फटकारले. तसेच कल्याणशेट्टी मला पालक मानतात की नाही, हे मला माहिती नाही. मी या संदर्भात कोणतीही तक्रार करणार नाही. मी रडणारा नव्हे तर लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपले स्वतंत्र पॅनेल असेल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.