सोलापूर - राज्यातील सर्वाधिक उत्सवप्रिय शहर असलेल्या सोलापुरात यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे डीजेमुक्त आणि मंगलमय वातावरणात पार पडला. यासाठी डीजेमुक्त सोलापूर कृती समितीच्या नेतृत्वात मोठे जनआंदोलन उभे राहिले..सोलापुरातील ‘सकाळ’चे कार्यालय या चळवळीचे केंद्र बनले. सोलापूरकरांनी दिलेल्या लढ्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. सोलापूरच्या धर्तीवर पुण्यासह संपूर्ण राज्यात डीजेबंदीची मागणी मूळ धरू लागल्याचे दिसत आहे.प्रत्यक्ष कृती कार्यक्रम, समाज प्रबोधन अन् लोकसहभागातून या लढ्याचा पहिला टप्पा गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये यशस्वी झाला. सोलापूर शहर आणि जिल्ह्याने घालून दिलेला हा आदर्श आज संपूर्ण राज्यात कौतुकाचा विषय ठरला आहे..या चळवळीमुळे सोलापूरची वेगळी छाप राज्यभर उमटली असून, इतर जिल्ह्यांमध्येही याच धर्तीवर मोहिमा राबविण्याची तयारी होऊ लागली आहे. त्यामुळे ‘डीजेमुक्ती’ची क्रांती सोलापुरातून उगम पावून राज्यभर पसरली, असे चित्र निर्माण होऊ लागले आहे..डीजेमुक्तीच्या लढ्यातील महत्त्वाचे टप्पे असे...जागविला विश्वास...‘डीजेमुक्त सोलापूर’ कृतीत आणायचे हे ‘सकाळ’ टीमने ७ ऑगस्ट रोजीच ठरवले. सोलापुरातील मान्यवरांशी संवादानंतर १२ ऑगस्ट रोजी ‘सकाळ’ कार्यालयात ‘डीजेमुक्त सोलापूर कृती समिती’ची स्थापन झाली. या समितीने डीजेमुक्तीसाठी गणेशोत्सव २०२५ ते गणेशोत्सव २०२६ असा कृती कार्यक्रम सुरू केला.एखाद्या वृत्तपत्राच्या पुढाकारातून कृती समितीची स्थापना होते. त्यानंतर अनेक संस्था पुढे येतात. हजारो सामान्य लोकांना यात सामावून घेतले जाते. अनेक समाजघटक रस्त्यावर उतरतात, असे सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले..ज्येष्ठ नागरिकांनी पेटवले रान...‘सकाळ’ कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांच्या दोन बैठका झाल्या. २२ संघटनांच्या माध्यमातून शेकडो ज्येष्ठ नागरिक २० ऑगस्टला रस्त्यावर उतरले. शासकीय विश्रामगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या शिष्टमंडळाला पोलिस आयुक्तालयात होणाऱ्या शांतता कमिटीच्या बैठकीला बोलाविले..डीजेची ‘गाठ’ कापली‘सकाळ’ कार्यालयात ४८ डॉक्टर दोन तासांपर्यंत खल करत होते. त्यानंतर २५ ऑगस्टला ५३८ डॉक्टर रस्त्यावर उतरले. ऑफिसर्स क्लब ते पोलिस आयुक्तालय मोर्चा काढला. आयुक्त एम. राज कुमार यांनी तासभर चर्चा केली. शहरातील आरोग्य सेवा, रुग्णांना होणाऱ्या डीजे व लेझरच्या त्रासाबद्दल गंभीर बाबी डॉक्टरांनी मांडल्या. या सर्वांतून सहभागी डॉक्टरांनी जणू डीजेची ‘गाठ’ कापून काढली..ठोकला शेवटचा खिळाडीजेमुक्तीसाठी मिस कॉलचा प्रस्ताव घेऊन आलेल्या वीरशैव व्हिजनसोबत डीजेमुक्त सोलापूर कृती समितीची बैठक ‘सकाळ’ कार्यालयात झाली. पहिल्या दिवशी दर तासाला सरासरी ३००+ मिस कॉल देत सोलापूरकर डीजेविरुद्धच्या असंतोषाला वाट करून देत राहिले. यामुळे जणू डीजेच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकला गेला. दरम्यान, विद्यार्थ्यांची मानवी साखळी, रॅली निघत राहिल्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.