Sugar industry : इथेनॉलच्या जाचक अटींमुळे साखर उद्योगासमोर संकट
Solapur News : यंदाच्या हंगामात राज्यात १०० ते १०२ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचे अनुमान आहे. त्यापैकी १२ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्याचा अंदाज आहे. यामुळे राज्यात एकूण निव्वळ ९० लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.
माळीनगर : इथेनॉल वर्ष २०२४-२५ करिता तेल कंपन्यांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांमध्ये सहकारी साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या इथेनॉल पुरवठ्याकरिता प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.