esakal | खासगी सावकारकीचा पाश ! सोलापुरात मिठाई विक्रेत्याची आत्महत्या; पोलिसांचा उपासेंच्या घरासमोर ठाण
sakal

बोलून बातमी शोधा

0savkar_0 - Copy.jpg

चक्रवाढ व्याजदरामुळे रक्‍कम फेडणे मुश्‍किल
दहा हजारांहून अधिक रक्‍कम घेतल्यास त्यावर दहा ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत व्याजदर लावला जातो. आठवड्याला अथवा दरमहा व्याज न दिल्यास संबंधित व्याज मुद्दलमध्ये जमा करुन त्यावर व्याज लावले जाते. या चक्रवाढ व्याजदरामुळे काही महिन्यांतच मुद्दल दुप्पट, तिप्पट होते. व्यवसायात मंदी अथवा काही अडचण आल्यास सदर रक्‍कम भरणे कठीण जाते. त्यावेळी खासगी सावकारांकडून धमकी दिल्या जातात. तत्पूर्वी, कर्जदाराकडून कोरे स्टॅम्प, धनादेश घेतले जातात. त्या भितीपोटी शेवटी तो आत्महत्येचे पाऊल उचलतो, असे चित्र मागील काही दिवसांत पहायला मिळाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी अशा कर्जदारांनी थेट पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहनही केले आहे.

खासगी सावकारकीचा पाश ! सोलापुरात मिठाई विक्रेत्याची आत्महत्या; पोलिसांचा उपासेंच्या घरासमोर ठाण

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : खासगी सावकाराने कर्जासह व्याजाच्या रकमेसाठी तगादा लावला होता. दुसरीकडे कोरोनामुळे मिठाई विक्रीची उलाढालही ठप्प होती. या कंटाळून केतन विजयकुमार उपासे (रा. सत्तर फूट रोड, गोली अपार्टमेंट) यांनी शुक्रवारी (ता. 25) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली, मात्र त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. त्यामुळे जेलरोड पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. तरीही शनिवारी (ता. 26) रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी तक्रार दिलेली नव्हती.

घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर केतन उपासे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यावेळी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कातील कुटुंबियातील सदस्य होम क्‍वारंटाईन असल्याने पोलिसांना त्यांच्याशी थेट संपर्क करता आला नाही. तरीही पोलिसांनी सावकाराबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाफर मोगल यांनीही उपासे यांच्या घरी भेट दिली. मात्र, मुलगा गेल्याने दु:खात असलेल्या आई- वडिलांनी तक्रार करण्यास संमती दर्शविली नाही. आता पोलिसांनी आत्महत्येच्या कारणाची चौकशी करण्यासाठी कुटुंबियांकडे उपासे यांच्या मोबाईलची मागणी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. उद्या रविवारी (ता. 27) याबाबत पोलिसांत तक्रार दाखल होण्याची शक्‍यता असून त्यानंतर तो खासगी सावकार नेमका कोण, पोलिसांत फिर्याद द्यायला कुटुंबातील सदस्य का घाबरत होते, याची चौकशी होईल, असेही सांगण्यात आले.

चक्रवाढ व्याजदरामुळे रक्‍कम फेडणे मुश्‍किल
दहा हजारांहून अधिक रक्‍कम घेतल्यास त्यावर दहा ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत व्याजदर लावला जातो. आठवड्याला अथवा दरमहा व्याज न दिल्यास संबंधित व्याज मुद्दलमध्ये जमा करुन त्यावर व्याज लावले जाते. या चक्रवाढ व्याजदरामुळे काही महिन्यांतच मुद्दल दुप्पट, तिप्पट होते. व्यवसायात मंदी अथवा काही अडचण आल्यास सदर रक्‍कम भरणे कठीण जाते. त्यावेळी खासगी सावकारांकडून धमकी दिल्या जातात. तत्पूर्वी, कर्जदाराकडून कोरे स्टॅम्प, धनादेश घेतले जातात. त्या भितीपोटी शेवटी तो आत्महत्येचे पाऊल उचलतो, असे चित्र मागील काही दिवसांत पहायला मिळाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी अशा कर्जदारांनी थेट पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहनही केले आहे.

loading image
go to top