
उ.सोलापूर : उन्हाळी कांद्याची आवक वाढताच दरात मोठी घसरण सुरू झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेने सोलापूर बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये इतके दर कमी झाले आहे. येणाऱ्या काळातही कांद्याचे दर दबावातच राहतील, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या दर घसरणीमुळे उन्हाळी कांदा उत्पादकांचा हिरमोड झाला आहे.