
Solapur Flower Market: उन्हाचा कडाखा वाढला असल्याने सुगंध देणाऱ्या फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे शहर बाजारात फुलांचे दर वाढलेले आहेत. सध्या सणांचा काळ सुरु असून लग्नसराईही आहे. परंतु फुलांची आवक याकाळात कमीच असल्याने अस्सल फुलांच्याजागी काहीप्रमाणात प्लास्टिकच्या फुले अन् पुदिन्याच्या हारांनी ही कसर भरून काढली आहे.